राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या नोंदणी शिबिराची सुरुवात रविवारपासून

मनपातर्फे शहरातील पात्र नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

नागपूर :-  केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत मनपातर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना मदत पोहचविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मनपाच्या दहाही झोन मध्ये वेगवेगळ्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नोंदणी शिबिराची सुरुवात २७ फेब्रुवारी पासून लक्ष्मीनगर झोन अंतर्गत विवेकानंद नगर येथील बॅडमिंटन हॉल येथून सकाळी १० वाजता होत आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह झोन कार्यालयात जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे/पात्रता
– जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
– मासिक उत्पन्न १५ हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
– पूर्ण पत्ता असल्याचा दाखला/आधार कार्ड
– दोन पासपोर्ट फोटो

शिबिराची झोननिहाय माहिती
१. लक्ष्मीनगर झोन – २७ व २८ फेब्रुवारी – बॅडमिंटन हॉल, विवेकानंद नगर – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
२. धरमपेठ झोन – १ व २ मार्च – अग्रसेन भवन, रवीनगर – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
३. हनुमाननगर झोन – ३ व ४ मार्च – ईश्वर देशमुख महाविद्यालय सभागृह, क्रीडा चौक – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
४. गांधीबाग झोन – ५ व ६ मार्च – टाऊन हॉल, महाल – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
५. सतरंजीपूरा झोन – ७ व ८ मार्च – मुदलियार सभागृह, शांतीनगर – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
६. लकडगंज झोन – ९ व १० मार्च – कच्छी विसा, ओसवाल समाजभवन, एव्हीजी लेआऊट, लकडगंज – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
७. आशीनगर झोन – ११ व १२ मार्च – ललित कला भवन, ठवरे कॉलोनी, – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
८. मंगळवारी झोन – १४ व १५ मार्च – स्वामी अय्यपा टेम्पल, श्याम लॉन जवळ, मानकापूर ते गोरेवाडा रिंग रोड – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
९. धंतोली झोन – १६ व १७ मार्च – राष्ट्रसंत तुकडोजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अग्याराम देवी चौक, गणेशपेठ – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
१०. नेहरूनगर झोन – १९ व २० मार्च – राजीव गांधी सभागृह, नंदनवन  – सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गुजरात चे "सरदारधाम" बनले सनदी अधिकाऱ्यासाठी तीर्थक्षेत्र.

Sun Feb 27 , 2022
पाटीदार समाजाचा अभिनव उपक्रम. फक्त १ रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था. नागपुर – गुजरातला माझे एक मित्र आहेत. रामजीभाई पटेल हे त्यांचे नाव. ते हिऱ्याचे व्यापारी आहेत. साधारणपणे १ हजार कोटी रुपयांची त्यांची उलाढाल आहे. ते मला नेहमी म्हणायचे, काठोळे साहेब गुजरातको आओ, पाटीदार भवन देखो. केवल १ रुपये में बच्चो को आय ए एस का ट्रेनिंग दिया जाता है. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com