पोरवाल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवस कार्यक्रम थाटात संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवस ‘ प्रचंड विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमाला जवळपास 200 च्या वर विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण हे होते, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मधुकर वासनिक पी. डब्ल्यू.एस. कॉलेज नागपूर चे डॉ अमोल मेंढे हे होते. विचारपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती, उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी, कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे, लेडी ऑफिसर डॉ. निशिता अंबादे हे सर्व मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे  यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्य आणि शिस्त वृद्धिंगत होऊन  सेवाभाव आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये आत्मसात करायला पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

यानंतर सत्र 2022- 23 या वर्षात राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाने राबवलेल्या विविध कार्यक्रमात ज्या पाच स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला  त्यात अंशिता पिल्लई, पूजा चौधरी, धम्मदीप खोब्रागडे, निशांत ठाकरे, महेश धोंगडे या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ. अमोल मेंढे यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रनिर्माणासाठी तरुण वर्गाने आपल्यापुढे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा आदर्श कशाप्रकारे ठेवला पाहिजे हे सांगितले. डॉ. कलाम यांनी सदैव आपल्या कृतीतून राष्ट्राचा विकास कसा साध्य करता येईल हे स्वप्न उराशी बाळगले होते.  प्राध्यापकांनी सुद्धा आपल्या हातून चांगले विद्यार्थी कसे घडेल याची सदैव दक्षता घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्वल केले पाहिजे, शिवाय विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन सुद्धा रुजवायला पाहिजे असे सांगितले.  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विनय चव्हाण यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सेवाभाव हा महत्त्वाचा आहे, या योजनेमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवेचे व्रत या ठिकाणी स्वीकारले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. शिवाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि समाजामध्ये कार्य करण्याची वृत्ती उदंड प्रमाणात असायला हवी तरच ते समाजामध्ये चांगले कार्य करु शकतात असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश जोगी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. निशिता अंबादे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ. इफ्तेखार हुसेन,डॉ. सतिश डुडुरे, डॉ. तारुण्य मुलतानी, डॉ. राजेश पराते,डॉ. समृद्धी टापरे , डॉ. मंजिरी नागमोते ही प्राध्यापक मंडळी आवर्जून उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंड होता. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महानगरात 7 हजार पंचनामे पूर्ण

Wed Sep 27 , 2023
– साडे तीन हजार कुटुंबीयांना धान्य किट – जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपीडित भागाला भेट – उपमुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या दिवशीही आढावा – उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार – साफसफाईला प्राधान्य देत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नागपूर :- शनिवारच्या मुसळधार पावसानंतर प्रशासन स्तरावरून पंचनाम्याला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 7 हजार 169 पंचनामे पूर्ण झाले असून 3 हजार 370 कुटुंबीयांना धान्य किटचे वाटप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com