– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 27:-जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिम दरवर्षी राबविन्यात येत आहे . भारतामध्ये 13 जानेवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही यानुसार ही पल्स पोलीओ लसिकरण मोहिम आज 27 फेब्रुवारीला शासकीय उपजिल्हा रुग्नलया कामठी च्या वतीने कामठी शहर व छावनी परिषद तसेच ग्रामीण भागातील एकूण 200 बूथ वर राबविन्यात येत आहे.या पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त होत असून या मोहिमेअन्तर्गत आज एकून 200 केन्द्रवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 0 ते 5 वर्षे वयोगटातिल 15 हजार 325 बालकाना पल्स पोलिओ लसिकरण चे डोज पाजन्याचे उद्दिष्ट असून आज सकाळो 8 वाजेपासूनच या पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला
या पल्स पोलीओ लसिकरण मोहिमेत आज एकूण 200 केन्द्रासह मोबाइल वैन, ट्रांजिस्टर बूथ यासह रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पंचायत समिति, पोलिस स्टेशन आदि ठिकाणी केन्द्राची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ग्रामीण भागातील गुमथळा व गुमथी प्राथमिक आरोग्य केन्द्रच्या वतीने सुद्धा पोलिओ डोज लसीकरण ची व्यवस्था करण्यात आली आहे.तेव्हा पोलिओ मुक्त भारत निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या पोलिओ डोज लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारो डॉ संजय माने यांनी केले आहे.