नागपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन 9 डिसेंबरला जिल्हा न्यायालयात करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 86 हजारापेक्ष जास्त न्यायलयीन प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे तडजाडीसाठी ठेवण्यात येणार असून संबंधित पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनजिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल व जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्या. सचिन पाटील यांनी केले आहे.
9 डिसेंबरला संपूर्ण राज्यात उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठ, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधिकरण आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.