संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे हिंदी विभागातर्फे १४ सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विनय चव्हाण हे होते. तर प्रमुख पाहुणे आणि वक्त्या म्हणून डॉ.रेणू तिवारी ह्या होत्या. विचारपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनीष चक्रवर्ती, आय.क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे आणि हिंदी विभागप्रमुख डॉ. विकास कामडी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे विभागप्रमुख डॉ. विकास कामडी यांनी केले. त्यांनी या प्रास्ताविकामधून हिंदी पंधरवडाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धाची माहिती दिली. त्यात वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,हस्तलेखन स्पर्धा, इत्यादी स्पर्धांचा समावेश असेल असे सांगितले. महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर अशी माहिती दिली. हिंदी दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा भाषणे दिली त्यामध्ये प्रकाश गोस्वामी,प्रज्वल सोलंकी, पुनम साहू, प्रणित पाटील, मनस्वी बोरकर, नूरजाहा खातून, रुक्सार परवीन, तंजिल फातिमा इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आणि वक्त्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी यांनी आपल्या भाषणांमधून सांगताना म्हटले की, भारतातील 75 टक्के बिगर हिंदी भाषिक लोक हिंदी ही भाषा समजू शकतात शिवाय बोलू शकतात. त्यामुळेच हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. हिंदी भाषेने भारताची संस्कृती जोडून ठेवलेली आहे. शिवा हिंदी भाषेचा गुगल मध्ये सुद्धा समावेश झाला आहे. कार्यक्रमाचे विशेष अतिथी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनीष चक्रवर्ती यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, हिंदी भाषेला कुठल्याही भाषिक बंधनामध्ये ठेवू नये. हिंदी मध्ये अनेक भाषेतील शब्द समाविष्ट झाली असून भविष्यातही असे शब्द पुन्हा समाविष्ट होणार आहे असे सूचक वक्तव्य केले. आय. क्यू.ए. सी. समन्वयक डॉ. प्रशांत डोंगळे यांनी म्हटले की, हिंदी भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. हिंदीची असलेली देवनागरी लिपी ही सर्व सर्वांना लिहिता येऊ शकते. समजू शकते. हिंदी साहित्य हे किती समृद्ध आहे याची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विनय चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून म्हटले की, हिंदी ही सौंदर्यपूर्ण आणि रसपूर्ण अशी भाषा आहे. तिच्या खोलीमध्ये आपण जेवढे जाऊ तेवढी ती समजायला सोपी आणि रसपूर्ण अशी आहे. हिंदी ही चित्रपटाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचली आहे. आणि तिने आपले सौंदर्य जपले आहे असे सुद्धा म्हटले. हिंदी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणाचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी डॉ. संजीव शिरपुरकर,डॉ. नितीन मेश्राम, डॉ. अझहर अबरार, डॉ. यशवंत मेश्राम, एन.एस.एस.अधिकारी डॉ. विनोद शेंडे, एन.सी.सी. अधिकारी लेफ्टिनेंट मोहम्मद असरार, डॉ. तारुन्य मुल्तानी, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. गिरीश संगेवार, विलास पजई , वेंकट, सीमा पाटिल, पूर्वी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रम संयोजक डॉ. विकास कामडी यांनी केले तर आभारप्रदर्शन मराठी विभाग प्रमुख डॉ. महेश जोगी यांनी केले.