जबलपूर येथील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेत्या महाराष्ट्र महिला संघाचे तसेच उपविजेत्या राज्याच्या पुरुष संघाचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन  

मुंबईदि. 31 :- जबलपूर येथे झालेल्या 54 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत आतापर्यंतचे 23 वे विजेतेपद मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला संघाचे तसेच उपविजेत्या पुरुष संघाचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. 

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूला दिला जाणारा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जिंकलेली महाराष्ट्राची कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह सर्व सहकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले आहे. महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला असला तरी विजेत्या रेल्वेच्या संघात 12 पैकी 11 खेळाडू महाराष्ट्राचे आहेतही बाबही अभिमानाची असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूसाठीचा एकलव्य पुरस्कार जिंकणाऱ्या रेल्वेच्या महेश शिंदे याचे तसेच तृतीय क्रमांक विजेत्या कोल्हापूरच्या पुरुष संघाचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. वेगचपळतानिर्णयक्षमतेचा कस पाहणाऱ्या खो-खो खेळात  महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे इथल्या मातीचेच वैशिष्ट्य असल्याचेही उपमुख्यमंत्री यांनी  म्हटले आहे.

0000

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

रजत जयंती समारोह में गीतों की बहार

Fri Dec 31 , 2021
-भास्कर वाघुले एंटरटेनमेंट का कार्यक्रम  नागपुर – भास्कर वाघुले एंटरटेनमेंट के गायकों ने रजत जयंती समारोह में विभिन्न हिंदी गीतों को प्रस्‍तुत कर कार्यक्रम की नई उंचाई पर लेके गएं। दर्शकों ने इस कार्यक्रम की और गायकों की सराहना की । भास्कर वाघुले एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत रजत जयंती समारोह ‘द चांस 25’ का आयोजन गुरुवार को रेशमबाग स्थित कविवर्य सुरेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com