नरखेड :- दिनांक १८/०८/२०२४ रोजी नरखेड शहरात अवैद्यरित्या दारू विक्री होत असल्याबाबत गोपनिय माहिती वरून पोलीस पथकाने नरखेड शहरातील ईसम नामे दिनेश सोमकुंवर याचे राहत्या घरी अवैधरित्या दारू विक्री बावत रेड केली असता त्याचे राहते घरात १५ लिटर मोहाफुल गावठी दारू किमती ७५०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द पोस्टेला महा, दारूबंदी कायदा अन्यये गुन्हा नोंद केला.
दिनांक १८/०८/२०२४ रोजी नरखेड शहरात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याबाबत गोपनिय माहिती वरून पोलीस पथकाने नरखेड शहरातील ईसम नामे उमेश गजबे याचे राहत्या घरी अवैधरित्या दारू विक्री बाबत रेड केली असता त्याचे राहते घराचे समोरील सामटीत ६ प्लास्टिक डबक्या प्रत्येकी १५ लिटर क्षमतेच्या असा एकूण ९० लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती ४,५००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोस्टेला कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, बापू रोहोम उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब काटोल विभाग काटोल यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि अजित आ. कदम ठाणेदार पोलीस स्टेशन नरखेड, पोउपनि गणेश पडवार व पोलीस स्टॉफ पोहवा गजानन तितरे, मपोहवा मनिषा सावरकर, पोशि जालिंदर राठोड, पोशि गणेश ताजणे, पोशि उत्तरेश्वर ठोंबरे, पोशि केवल आडे पोलीस स्टेशन नरखेड यांनी केली आहे.