– शिवशक्ती नगर नंबर 2 हनुमान मंदिराच्या परिसरातील विकास कामासाठी आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाने घेतली धाव:
नागपूर :- दक्षिण नागपूर येथील प्रभाग 34 मध्ये शिवशक्ती नगर नंबर 2 येथील हनुमान मंदिर परिसरातील चर्चा कार्यक्रमात विकास कामासाठी आणि समाजसेवा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पत्रकार संघातर्फे सत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकार संजय पांडे व आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने आज चर्चामध्ये शिवशक्ती नगर नंबर 2 येथे विकास कामासाठी आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर चरडे (गुरुजी ) यांनी शिवशक्ती नगर नंबर – 2 येथील वस्तीतील नागरिकांशी चर्चासत्र आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विकास कामे कशी करायची ? आणि कशा पद्धतीने करायची ? हे समजावून सांगितले. कोणत्याही आमदार / नगरसेवकांची गरज नाही ! आपणच स्वतः विकास कामे करावी असे मार्गदर्शन करण्यात आले. जर काही प्रॉब्लेम असल्यास आमच्या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाशी चर्चा करून संपर्क साधावा. जे काही कार्य होत नाही ते आम्हाला सांगण्यात यावे. आम्ही ताबडतोब तुमचे पाठीशी राहून तुमच्या वस्तीतील सर्व कामे करू असे आश्वासन दिलेत.
शिवशक्ती नगर 2 मध्ये मंदिर परिसरातील साफसफाई स्वच्छता हा विकास कामे करण्यासाठी या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी सुधाकर कवडे, गेडाम काकाजी, संजय गाडगे, देवराव प्रधान, राजू काळे, पत्रकार संजय पांडे, निलेश चिंचोलकर, काशिनाथ बुराडे, सागर नांदुरकर, किशोर बुराडे, विकास हिंगे, दिपक खेडकर, मधूभाऊ चिकलाचा राजा, फिल्म डायेरकर संजय भुजाडे, विकास हिंगे,अभिनेता दीपक खेडकर, राजेश वाघाडे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अशोक मेश्राम, केसरी मेश्राम, मंजू गायधने, साक्षी हिंगे, संचिता बेसरवार, ज्योती बुराडे, ज्योती शेलोडे, वर्षा काळे, प्रतिभा प्रधान, साक्षी हिंगे, दापूरकर, सुरेखा बुराडे यांची उपस्थिती होती. हिंदू राठोड यांचा सत्कार करण्यात आला असून त्यावेळी जेष्ठ नागरिकांचा व जेष्ठ महिलांचाही शाल व पुछगुछ देवून सत्कार करण्यात आला.
शिवशक्ती नगर नं. 2 मधील केशरी अशोक मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ मधे प्रवेश केला. त्यांना नागपूर ग्रामीणचे उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. त्याच प्रमाणे साक्षी विकास हिंगे यांना महिला संघतीका, कांचन मस्के विदर्भ सचिव व स्मिता वाघमारे यांना विदर्भ उपसचिव, ज्योती काशिनाथ बुराडे यांना नागपूर शहर सदस्य पदावर नियुक्ती, संजय पांडे नागपूर जिल्हा सचिव, ज्योती शेलोडे यांची नागपूर शहर सदस्य पदावर नियुक्ती, संचित बेसरवार यांची नागपूर जिल्हा सदस्य पदावर नियुक्ती, त्याच प्रमाणे सागर नांदुरकर, दीपक खेडकर, किशोर बराडे, विकास हिंगे, योगेश राजुसकर, पवन हेडाऊ,विनायक हेडाउ, कुणाल शंकर बेलखेडे, काशिनाथ बुराडे, या सर्वांची आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघातर्फे नियुक्त्या करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर चरडे गुरुजींच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.