नागपूर :- राजमुद्रा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून ‘नमो आमदार चषक २०२४’चे आयोजन करण्यात येत आहे. ‘नमो आमदार चषक’ अंतर्गत चिटणीस पार्क महाल येथे १९ फेब्रुवारीपासून पुरूष व महिलांच्या खो-खो व कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
चिटणीस पार्क महाल येथे १८ व १९ फेब्रुवारीला पुरूष आणि महिलांसाठी कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात येईल. तर २०, २१ आणि २२ फेब्रुवारीला पुरूष व महिला गटातील खो-खो अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी होण्याचे आवाहन राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.