नागपूर :- देशाच्या सिमेवर २४ तास पहारा देवून देशातील तमाम नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवून त्यांच्या कार्याचे सलाम करने, प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.नागपूरकर चला सैनिकांसाठी पाठवा राखी सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया त्यांच्या रक्षणासाठी राख्या पाठवूया. या अभियानात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सहभागी होऊया, असे आव्हाहन नागपूरकरांनतर्फे करण्यात आले आहेत. दिनांक १४ ऑगस्ट २०२४, बुधवार रोजी सकाळी १०.३० ला जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाईन, नागपूर यांच्यामार्फत पाठविण्यात येणार आहे. असे आयोजकांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक निखिल भुते ९४०३५८६७२४ “भुते निवास” सिरसपेठ, उमरेड रोड, रेशीमबाग, नागपूर तसेच मार्गदर्शक नागपूरकर महाराज श्रीमंत राजे मुधोजी भोसले, सचिव विक्रांत चिलाटे, सदस्य पंकज बान्ते आणि संपूर्ण नागपूरकर पदाधिकारीगण यांच्यातर्फे संपूर्ण नागपूरकरवासियांना आवाहन करण्यात आलेले आहे.