नागपूरकर श्रीनभ अग्रवालला आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे वितरण

नागपूर  : अगदी किशोर वयात संशोधन क्षेत्रात अभुतपूर्व कामगिरी करणाऱ्या श्रीनभ मौजेश अग्रवाल या किशोर वयीन नागपूरकराला उद्या दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद मोदी उद्या देशातील विविध राज्यांच्या मुलांना हा पुरस्कार बहाल करणार आहे.
केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत किशोरांना दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिल्या जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मुलांना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती स्मृती ईराणी यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कोरोना प्रकोप लक्षात हा सोहळा ऑनलाईन होणार आहे. उद्या 11 वाजता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून या सोहळ्यामध्ये नागपूरचे जिल्हाधिकारी आर. विमला, श्रीनभचे वडील डॉ. मौजेश अग्रवाल, आई डॉ. सौ. टिनू अग्रवाल सहभागी होणार आहे. उद्या श्रीनभ याला हा पुरस्कार डिजीटली दिला जाणार आहे. डिजीटल प्रमाणपत्र व रोख रक्कम पुरस्कार विजेत्याच्या खात्यात जमा करणार आहे.
श्रीनभने लहान वयातच वैज्ञानिक क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. त्याने स्वत: दोन पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्याचे अनेक लेख छापून आले आहेत. याशिवाय ‘ट्रीपल लॉक बोर होल प्रोटेक्शन लीड’ वर त्याचे पेटंटदेखील प्रकाशित झाले आहे. ‘आयआयटी कानपूरचे’ भौतिकशास्त्राशी संबंधित दोन अभ्यासक्रमदेखील त्याने पूर्ण केले आहेत. याशिवाय कमी वयात पुस्तक लिखाणसंदर्भात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये देखील त्याच्या नावाची नोंद आहे. श्रीनभ सध्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगलोर येथे प्रथम वर्षात (बीएस/रिसर्च) शिक्षण घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

एनआयटी दे वाठोडा के 1200 मकानो को मालिकाना हक्क

Mon Jan 24 , 2022
– लीज को करे फ्रिहोल्ड, पिडित जनता शुल्क भरणे तैयार  नागपूर – मौजा वाठोडा, .शीट नंबर ५० व भुमापन 230, खसरा क्रमांक 157 नागपूर यहा स्थित धरती माँ लोककल्याण सोसायटी और मानव शक्ती गृहनिर्माण सहकारी संस्था नागपुर इनके द्वारा वर्ष 2000 मे 1200 प्लॉट लोगो को बेचे गये, लोंगो ने अपनी मेहनत की कमाई और कर्ज लेकर पक्के मकान बनाये, इस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com