नागपूर :- दिनांक २३/०२/२०२४ रोजी सकाळी ०४.४५ वा. दरम्याण पो.स्टे. हद्दीत गस्त चेकींग दरम्याण अवैध्य रेतीवर आळा घालण्या करीता पेट्रोलिंग करीत असतांना जुनी नारसिंगी पांदन रोडवर ०४ ट्रैक्टर क्रमांक १) MH40 A-4070 व ट्रॉली २) MH 40 CQ-6983 व ट्रॉली ३) RTO पासींग नाही व ट्रॉली RTO पासींग नाही ४) RTO पासींग नाही ट्रॉली कमांक MH 32 A-8995 व हे येतांना दिसले याचा पाठलाग करून जुनी नारसिंगी पांचन रस्ता गांवाजवळ त्यांना थांबवुन पाहणी केली असता वरील नमुद चाराही ट्रॅक्टर मध्ये अंदाजे ४ ब्रॉस रेती मिळुन आल्याने सदर ट्रॅक्टर चालकास व मालकास ट्रॅक्टर मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्यांची खात्री झाल्याने वरील चारही ट्रॅक्टर मध्ये ०४ ब्रॉस रेती किंमत २०,०००/- रू ट्रॅक्टर ट्रॉली किंमती २९,२५,०००/- रू असा एकुण २९,४५,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करून सदर ट्रॅक्टर चालक व मालक यांचे विरूध्द पोलीस स्टेशन अप कमांक ८०/२४ कलम ३७९, १०९ भादंवी सहकलम ४८(८), ४८ (७) महा.ज.म.स. सहकलम, ४, २१ खाणी आणि खनिजे अघि, १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ अन्वये पोलीस स्टेशन जलालखेडा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिश्वक (नागपूर ग्रा), अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधि. (काटोल वि. काटोल) यांचे मार्गदर्शनात जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि/सी.बी. चौहान, PSI मनोज शेंडे, पोलीस अंमलदार हरीहर सोनोने रविंद्र मोहोड, निलेश खरडे संतोष क्षिरसागर व होमगार्ड सैनिकांच्या मदतीने करण्यात आलेली आहे.