नागपूर राष्ट्रीय विधी विद्यापीठाला निधीची कमतरता पडणार नाही- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

नागपूर  : राज्य शासनाने मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ 2014 च्या अधिनियमान्वये स्थापन केले असून त्यासाठी शासनाने मागील दोन वर्षात 150 कोटी निधी मंजूर केला आहे. नागपूर येथे वरणगाव परिसरात 60 एकर जागा नागपूर विद्यापीठासाठी दिली आहे. याठिकाणी शैक्षणिक संकुल बांधून पूर्ण झाले आहे. या विद्यापीठांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत दिले.

शासकीय विधी महाविद्यालय मुंबई, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्या विविध उपक्रमांचा आढावा आणि शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या आझादी 75 अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमीत भारतीय संविधानाच्या विविध तरतुदी वर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईत करण्यात आले.

यावेळी याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.शुकरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रसतोगी, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर कुलगुरू विजेंदरकुमार, शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या प्राचार्य अस्मिता वैद्य, बार कॉन्सिल चे सदस्य, प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या विकासकामांसाठी 150 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील 18 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर केले आहेत. पुढील आठवड्यात आणखी 12 कोटी रुपये दिले जाणार आहेत. विधी  विद्यापीठाच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

श्री. सामंत म्हणाले की, मा मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून राज्यातील विधी विद्यापीठांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच मुंबई विधी विद्यापीठासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

मुला-मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी साठी 95 कोटी रुपये इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी 18 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर केली आहे. वसतिगृहाचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच हे काम पूर्ण झाल्यास विद्यार्थी तेथे राहू शकतील. या शैक्षणिक वर्षापासून पूर्ण क्षमतेने ऑफलाईन कॉलेज सुरु होण्यास मदत होईल. त्यासाठी या कामाला गती द्यावी, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी राज्य सरकार तिन्ही राष्ट्रीय विधी विद्यापीठांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊन सहकार्य करीत असल्याबाबत आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीची २०२२ ची कार्यकारणी घोषीत

Thu Mar 3 , 2022
अध्यक्ष मृणाल गोस्वामी, सचिव सचिन बागडे, कार्यध्यक्ष डॉ.रविद्र वानखेडे कोषाध्यक्ष पायल सतदेवे गाणार  भंडारा : भंडारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीची बैठक दिनांक २६ पेâबु्रवारी ला सायंकाळी ७ वाजता नाशिक नगर येथिल मैत्रिय बौध्द विहार येथे पार पडली या बैठकीच अध्यक्ष स्थान प्रख्यात साहित्यीक अमृत बंसोड यांनी कमीटीच्या नविन कार्यकारणी  तयार करण्याचा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला यात सर्व प्रथम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!