पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी नागपूर महानगरपालिकेचा सन्मान

– मुंबईत माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा

नागपूर : महाराष्ट्र शासनाद्वारे माझी वसुंधरा २.० अभियान अंतर्गत आयोजित निसर्गातील पंचतत्वांवर आधारीत स्पर्धेत अमृत शहर गटामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी दिनांक ०५ जून २०२२ रोजी नागपूर महानगरपालिकेचा मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात उंच उडी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वातील चमूने नागपूरकरांच्या वतीने हा सन्मान स्वीकारला.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे, नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बनर्जी, सहाय्यक आयुक्त किरण बगडे आणि संदीप लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेमध्ये अमृत गटात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या शहरांमध्ये नागपूर महानगरपालिकेची देखील निवड करण्यात आली होती. रविवारी ( ता. ५ जून) सकाळी मुंबई मधील टाटा थिएटर, एन.सी.पी.ए. नरीमन पाँईंट येथे सर्व विजेत्या चमूंचा सन्मान सोहळा पार पडला.
वर्षभर पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे नागपूर महानगरपालिकेने या स्पर्धेत मुसंडी मारली.
मनपाच्या या यशामध्ये शहरातील विविध स्वयंसेवी संस्था व नागरिक यांचे सुध्दा मोठे योगदान आहे. त्यामुळेच मनपाला हे यश लाभल्याचे मनोगत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले. दरम्यान भविष्यात देखील मनपाचा कार्यालेख असाच उंचावणार असल्याचेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर येथे पशुवैद्यकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार - सुनील केदार

Mon Jun 6 , 2022
‘माफसू’चे शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पशुवैद्यकांच्या बैठकीत घोषणा नागपूर : खाजगी व शासकीय पशुवैद्यक यांना एकत्रित करून मुक्या जनावरांची अद्यावत शुश्रूषा नागपूर शहरात लवकरच सुरू होणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये अद्ययावत पशुवैद्यकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा आज पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, युवक कल्‍याण व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली. विदर्भातील पशुधनाला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. उपलब्ध असणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!