नागपुर माहा मेट्रो चा अजब कारभार
सुशिक्षित पदवीधर कर्मचाऱ्यांकडून करवले जातात साफसफाई ची कामे
नागपूर :- दिनांक 28/11/2022 ला नागपुर शहर युवक काँग्रेस कडून राष्ट्रिय युवक काँग्रेस चे महासचिव बंटी बाबा शेळके आणि नागपुर शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष तौसिफ खान यांच्या मार्गदर्शनात नागपुर माहा मेट्रोच्या विरोधात आणि स्वप्नील चे स्वप्न पूर्ण करण्यास माहा मेट्रो ऑफिस समोर आंदोलन करण्यात आले. कारण 21/11/2022 रोजी नागपुर माहा मेट्रो येथे निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या स्वप्नील रामटेके या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला त्रासून आत्महत्या केली. हा कर्मचारी निरीक्षक पदावर कार्यरत होता परंतु वरिष्ठ त्याच्या कडण साफसफाई , बाथरूम, संडास साफ करण्याचे काम करून घेत होते. त्यानी वारंवार या कामास नकार दर्शविला परंतु वरिष्ठां कडून मानसिक आणि शारीरिक शोषण वाढत जात होते. शेवटी हा दबाव सहन न झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली.
याचाच निषेध करण्यासाठी व या कर्मचाऱ्याच्या परिवारास न्याय मिळवून देण्यासाठी आणि पुढील काळात अशा प्रकारचा त्रास कुठल्याही कर्मचाऱ्यास होऊ नये याकरिता नागपुर शहर युवक काँग्रेस कडून माहामेट्रो ऑफिस समोर आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेस ने नरेंद्र मोदी, एकनाथ शिन्दे, देवेंद्र फडणवीस, ब्रिजेश दिक्षित, जे.पी. नड्डायांच्ये मुखोटे घालून त्यांना संडास ला बसवले कारण सुशिक्षित पदवीधर कर्मचारी जे BA, MA, B.COM, MBA, B.sc झाले आहे आणि उच्च पदावर कार्यरत आहे अशा कर्मचाऱ्यांना माहा मेट्रो चे अधिकारी दबावात आणून आणि त्यांचे मानसिक, शारीरिक शोषण करून त्यांच्या कडन खालच्या दर्जाची कामे करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे असे युवक काँग्रेस ने या लक्ष्यवेधी आंदोलन मध्ये दाखवले. आणि त्या कर्मचाऱ्याच्या परिवारातील एका व्यक्तीस माहा मेट्रो मध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा आणि आर्थिक मदत मिळावी अशी मागणी माहा मेट्रो कडे केली.
आंदोलनात प्रदेश महासचिव आकाश गुजर,प्रदेश सचिव सागर चव्हाण,प्रदेश सचिव मोइस खान, नावेद शेख,स्वप्निल ढोके, राहुल खैरकर, राज संतापे, वैभव राउत, शुभम सोनटक्के,अमन लुटे, अतुल नागपुरे, अतुल मेश्राम,सलीम शाह,निखिल कापसे,लव मेश्राम,विजय मिश्रा, टोनी पुणेकर,अनिकेत बनाईत, इत्यादी उपस्थित होते.