नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल झांबरे यांची निवड

नागपूर :- नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल झांबरे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन ॲड. झांबरे यांचे अभिनंदन केले व अध्यक्षपदाची सुत्रे सोपविली.

रविवारी (ता.२२) नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या सभासदांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ॲड. झांबरे यांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला.

ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी वैयक्तिक कारणामुळे संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ॲड. मेश्राम यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर ॲड. राहुल झांबरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याशिवाय संघटनेचे न्यायीक सल्लागार व मार्गदर्शक म्हणून भोला खोब्रागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेचे कार्याध्यक्ष हे पद निरस्त करण्याचा ठराव देखील बैठकीत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.

बैठकीला नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आशिष पाटील, महासचिव लोकेश मेश्राम, सहसचिव दिप्तीजय बोरकर, कोषाध्यक्ष कैलाश वनघुदे, कार्यकारीणी सदस्य मंगेश गोस्वामी, राहुल पांडव, खीलावन लांजेवार, शंकर मेश्राम आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यास मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त - न्या. सचिन पाटील

Mon Sep 23 , 2024
नागपूर :- मध्यस्थी हा वैकल्पिक वाद निवारणाचा एक उत्तम मार्ग असून न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश सचिन पाटील यांनी केले. नागपूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या न्यायाधीश सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधिश डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मध्यस्थी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com