वंचित समाजाचे प्रश्न भाजपा सोडविणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

मुंबई :- वंचित समाजाचे विकासाचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सोडवेल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय भोसले यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, प्रवक्ते असिफ भामला, पंडित राठोड आदी उपस्थित होते. भोसले यांच्या बरोबर राज्यातील घडशी समाज तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भोसले यांचे स्वागत करत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अनेक वर्षे काम केले असून त्यांनी दक्षिण मध्य मुंबईमधून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती.

बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आहे . पंतप्रधान मोदी आणि विकासाचा ध्यास असलेले राज्यातील नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओढा भाजपाकडे वाढला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून वंचित समाजाचे प्रश्न मार्गी लावले जातील तसेच घडशी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल असेही श्री. बावनकुळे यांनी नमुद केलं.

वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षीयांनी भाजपा बद्दल पसरवलेले गैरसमज दूर करण्याचा तसेच मोदी सरकार व महायुती सरकारच्या योजना दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असेही भोसले यांनी सांगितले.

भोसले यांच्या बरोबर भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये गोरख उबाळे, पंकज चाबुकस्वार, सुजाता कांबळे, संगीता शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे किसनराव हंडाळ, राज्य घडशी समाजाचे कार्याध्यक्ष शिवाजी कदम, पुणे जिल्हाध्यक्ष घनश्याम मोरे, अशोक काळे, सुनील वाडेकर, दयानंद खरात, किरण यादव, ऋषिकेश घाडगे आदींचा समावेश आहे.

NewsToday24x7

Next Post

ग्रामपंचायत रनाळा ला मिळाली नवीन कचरा गाडी .. 

Wed Sep 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- लोकसंख्येच्या वाढत्या प्रभावातून सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्या निर्णय घेत गावात नवीन कचरा गाडी पाहिजे या हेतूने ग्रामपंचायत रनाळा येथे सरपंच पंकज साबळे यांच्या पुढाकारातून व बाकी सदस्यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत रनाळा येथे 13 सप्टेंबर रोजी रनाळा येथे नविन कचरा गाड़ी चे लोकार्पण  सरपंच  पंकज  साबळे यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला, प्रामुख्याने सचिव राजु  […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com