नागपूर :- दिनांक ३०.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये २९ केसेस, तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०५ केसेस असे एकुण १४ केसेस मध्ये एकुण १६ ईसमावर कारवाई करून रू. २,४२.३६६/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ४,४९३ वाहन बालकांवर कारवाई करून एकूण रू. २,६१,३५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.