नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २७.०५.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेस तसेच एन.डी.पी. एस कायद्यान्वये ०३ केसेस मध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून रू. ६,१५०/- रू या मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०३ केस मध्ये ०३ ईसमावर कारवाई करून रू. १४,४५०/-रू या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,७०४ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,०७,७५९/- रू तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गांजा बाळगणाऱ्या आरोपीस अटक

Tue May 28 , 2024
नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून, पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत कामठी रोड, उपलवाडी, जम-जम आईस फॅक्ट्री मागे, कश्यपचे घरा समोर, कपिलनगर, नागपूर येथे राहणारा शुभम उर्फ विक्की रूपचंद शाहु वय २८ वर्ष त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यातुन १४ किलो १२० ग्रॅम हिरव्या रंगाचा ओलसर गांजा किंमती २,८२,४००/- रू. चा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com