नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २७.०७.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०९ केसेस, तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०१ केसेसे असे एकुण १० केसेसमध्ये एकूण ०९ ईसमांवर कारवाई करून १०,६२५/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण ०३ ईसमावर कारवाई करून ३.२७५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण १,९७५ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १२,०५,७५०/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवे ठार मारणाऱ्या पाहिजे आरोपीस अटक

Mon Jul 29 , 2024
नागपूर:- फिर्यादी सवीता ब्रीजलाल यादव वय ६० वर्ष हया त्यांचा मुलगा नामे निकेश उर्फ साई ब्रीजलाल यादव वय ४० वर्ष दोन्ही रा. इंदोरा, आनंद रोड, हनुमान मंदीर जवळ, जरीपटका, नागपूर याचेसह घराबाहेर वाकडयावर बोलत बसले असता त्यांचे घरासमोर एका दुचाकी मोटरसायकलने तिन ईसम आले, मोटरसायकल चालू ठेवुन दोन ईसम गाडीवर बसलेले होते. पैकी मागे बसलेला हा खाली उतरला तो पायदळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com