नागपूर :- नागपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष व आ.विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, माजी केंद्रिय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.21 ऑगस्ट ते 29 आॅगस्ट पर्यत रोज 2 ब्लॉक अनुसार ब्लॉक निहाय बैठका घेण्यात आली.
आजच्या बैठकीला उद्योग व वाणिज्य सेल चे अध्यक्ष अतुल कोटेचा, प्रदेश सचिव कमलेश समर्थ, महिला अध्यक्षा नॅश अली, नंदा पराते,बंटी शेळके,डॉ.गजराज हटेवार, रमन पैगवार विशेष उपस्थित होते.
बैठकीमध्ये सर्व ब्लॉक अध्यक्षांचा बुथ अध्यक्ष कमिटया, प्रभाग अध्यक्ष कमिटया,वार्ड अध्यक्ष कमिटया, बीएलए ब्लॉक ची परिस्थिती या वेळी जाणून घेतली. 2 ब्लॉक मध्ये येणा-या सर्व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकत्र्याना बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. सर्व ब्लॉक अध्यक्षांनी आपल्या ब्लॉकमधुन कार्यकर्त्यांना आणणे. त्याबद्दल शहर अध्यक्ष व आ. यांनी सर्व ब्लॉक अध्यक्षांनी केलेल्या कार्याची माहिती घेवून त्यांचे अभिनंदन केले. व पूढेही पक्षाला बळकटी साठी प्रयत्न करा असे म्हटले. यापूढे आपण ब्लॉक मध्ये बैठका घेवू नंतर बुथनिहाय बैठका घेवू बुथचे शिबीर आयोजित करु. आणि येणा-या लोकसभा,विधानसभा,मनपा निवडणूकीमध्ये पक्षाला यश मिळून देवू अशी हमी दिली.
माजी केद्रिय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांनी सांगितले की, केंद्रातील भाजपाचे जुलमी व अत्याचारी सरकार सन 2024 च्या निवडणुकीमध्ये हाणून पाडण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाची इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीची तिसरी बैठक महाराष्ट्रात दि. 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे होणार आहे. या इंडिया आघाडीच्या बैठकीचा आनंद आपण प्राताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2023 ला दुपारी 3.00 वाजता आपल्या ब्लॉक स्तरावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत समन्वय साधून पक्षाचा दुपटटा, झेंडे, ढोल-ताशा, फटाके, मिठाई वाटप करुन आनंदोत्सव साजरा करावा. तसेच डिझाइनचे बॅनर, जितेगा इंडिया चे फलक शहरातील मुख्य बाजारात लावण्यात यावे.
दि. 03 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2023 पर्यत विधानसभा निहाय जनसंवाद पदयात्रेचे आयोजन प्रसंगी आपण आपल्या ब्लॉक मधिल नागरिकांना गांधी टोपी, महागाईचे पत्रक घेवून मोठया संख्येने सामिल घ्यावे. जेणे करुन 6 ही विधानसभेत जनसंपर्क च्या माध्यमातून नागरिकांना कॉंग्रेस पक्षाची विचारधारेचा चांगला मॅसेज जाईल. पक्षाला बळकट मिळतील.
समापन प्रसंगी ब्लॉक 9 व ब्लॉक 18 ची बैठक संपन्न झाली. बैठकीत डॉ.गजराज हटेवार,रमन पैगवार, आशीष दिक्षित, बंटी शेळके, ब्लॉक अध्यक्ष गोपाल पटटम,पंकज निघोट, उमेश शाहू, हरीश खंडाईत, नंदा पराते, मोटी गंडेजा, महेश श्रीवास, पिंटू बागडी, आकाश तायवाडे,पुरुषोत्तम पारमोरे, प्रसन्ना बोरकर, फिरोज खान, अब्दुल नाजू,किरण गडकरी,शुभम आदमने, अजय नासरे, नरेश हुमणे, निखिल धांदे,मिनाक्षी भलफणे,राजेद्र तागडे, वंदना टेंभुर्णे, श्रेया ठाकरे, सर्वजित चहांदे,अरविंद वानखेडे,रवि गाडगे, रॉबर्ट वंजारी, अभय सोनकुळे,प्रशांत कापसे, जयंत दियेवार, दिपक गुडधे, मंगेश कामुने, कमलेश लारोकर,बाळकृष्ण तुराळे, हफिज खान, जुल्फेकार भुटटो, मदत गौर,नफीसा अहमद,दत्तात्रय पात्रिकर, दिलीप गांधी, हाजी मो.कलाम, अबुबकार खान, रेखा बाराहाते, प्रसन्न बोरकर,उमेश शाह, प्रा.अनिल शर्मा,राकेश वैदय, इरफान काझी, अतिक कुरैशी, शकील अहमद,मुक्तार भाई,रामभाउ वाकोडीकर, सुरेश काटीवले, दिनेश पारेख, श्रीकांत ढोलके, सैयदा बेगम, आसिफ अंसारी, इत्तकार कोसर,साजीद अनवर,रिजवान, अजीज अंसारी, अनिल मछले, अतिकु रहेमान, चंद्रभान खापेकर, अमित सपाटे, मोहम्मद अजहर, राधेष्याम लिमजे सहित ब्लॉक चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.