नागर्जुना अभियांत्रिकीमध्ये समाज वैज्ञानिकांची मंदियाळी : भगवान बुद्ध -महात्मा फुले -डॉ.बी.आर.आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन

नागपूर :-अमरावती रोडवरील सातनवरी गावाजवळ स्थित मैत्रेय एजूकेशनल सोसायटी द्वारा संचलित नागार्जूना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट हया महाविदयालयात भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे. व्याख्यानमालेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष इंजि. मदन माटे व अजय वाघमारे ह्यांच्या हस्ते व संयोजक प्राचार्य डॉ. संजय केलो आणि उपप्राचार्य डॉ.मुरलीधर रहांगडाले यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सदर संस्थेमार्फत सामाजीक बांधीलकीच्या दृष्टीने ना नफा ना तोटा या तत्वावर अभियांत्रीकी व व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेणा-या ग्रामीण दुर्गम व आदिवासी प्रदेशातील गरीब व होतकरु विदयार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामधे निवासाची व महाविद्यायालयात जाण्यायेण्याची निःशुल्क सेवा मोफत पुस्तक पेढी, प्रशिक्षण व रोजगार व्यक्तीमत्व विकास, एमपीएससी व युपीएससी परीक्षाची तयारी तसेच बारावित शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांसाठी मोफत एमएचसीईटी व जेईई चे वर्ग घेतले जातात. तसेच सर्व गुणवंत, होतकरु व गरीब विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात विशेष सुट दिली जाते.

व्याख्यानमालेची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहेत:-

व्याख्यानमालेतील पाहिले पुष्प महात्मा ज्योतीबा फुले जयंती

दि. ११/०४/२०२३- वेळ: दुपारी २:०० वाजता

विषय : महात्मा फुले यांचा वारसा आणि समकालीन भारतातील त्याची वास्तविकता

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते:

१) नागेश चौधरी (प्रख्यात समाजसेवक), नागपूर

२) डॉ.पुरणचंद्र मेश्राम (माजी कुलसचिव), नागपूर

व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

दि. १४/०४/२०२३

वेळ: सकाळी १०:३० वाजता

विषय : न्यायपूर्ण आणि सर्व समावेशक समाजासाठी आंबेडकरांची दृष्टी :समकालीन भारतातील आव्हाने आणि संधी

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते:

१) संजय आवटे, पुणे (सुप्रसिद्ध लेखक, संपादक आणि वक्ता)

२) ताराचंद खांडेकर, (डॉ आंबेडकर अध्ययन मंडळ, नागपूर)

व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प

बुध्द पौर्णिमा

दि. ४/०५/२०२३

वेळ: सकाळी १०:३० वाजता

विषय: भगवान बुद्ध : विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते:

१) डॉ.अशोक कांबळे, (अध्यक्ष मैत्रय बोध संस्था, यवतमाळ) (भन्ते बोधिअशोक)

२) मंगेश दहिवले, (बौद्ध तत्वज्ञानाचे विचारवंत, नागपूर)

तरी या सुवर्ण स्थितीचा लाभ घ्यावा असे आवाहान संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सदाबहार गीतांनी केले मंत्रमुग्ध

Sun Apr 9 , 2023
नागपूर :- गोल्डन इरा मेलोडीज तर्फे विदर्भ हिंदी साहित्य संमेलनात आयोजित जुन्या गाण्यांच्या सदाबहार गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संमेलनच्या मधुरम हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी आयोजक श्रीकांत ब्राह्मणे यांनी ओ जाने वाले हो सके तो लोट के आना या गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर सतीश गजभिये यांनी अपनी आखो में हे गीत सादर केले. दिल ने फिर याद किया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com