अमरदिप बडगे, प्रतिनिधी
पुराडा येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
शेंडा केंद्र प्रथम तर बिजेपार केंद्र द्वितीय
गोंदिया :- आदिवासी विकास विभागाद्वारे संचालित शासकीय व अनुदानित आश्रमशाळेचे प्रकल्प स्तरीय म्हणजे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथे नुकत्याच संपन्न झाल्या त्यामध्ये बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी आमदार संजय पुराण यांनी सांगितले की माझा आदिवासी विद्यार्थी हा खेळात सदैव अग्रेसर असुन खेळात कोठेही कमी नाही शरीरयष्टी ने दणकट आणि मेहनती असतो फक्त आदिवासी विद्यार्थ्यांना खेळासाठी योग्य मार्गदर्शन योग्य मैदानाची नितांत गरज आहे त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांना आर्चरीचे प्रशिक्षण दिले जाते हेही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून स्पर्धेचे उद्घाटन आमदार सहेसराम कोरोटे यांनी केले त्याप्रसंगी बोलताना आमदारांनी सांगितले की खेळासोबतच शिक्षणही अत्यंत आवश्यक आहे, मी प्रत्येक आश्रमशाळेत गणित, इंग्रजी विज्ञान मराठी भाषेचे तज्ञ सोबत घेऊन शैक्षणिक तपासणी करण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले, प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा दि.१४आक्टोंबर ते १६आक्टोंबर दरम्यान खेळल्या गेल्या या स्पर्धेत सांघीक व वैयक्तिक सर्वच प्रकारचे खेळ खेळये गेले,या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे शेंडा केंद्राने सलग पाचव्यांदा विजेते पद पटकावले तर द्वितीय क्रमांकावर बिजेपार केंद्र राहीले, या स्पर्धेत एकूण जिल्ह्यातील ९८१ विद्यार्थी सहभागी झाले होते तर १०८ क्रीडा शिक्षक होते.
बक्षीस वितरण समारंभात सहाय्यक प्रकल्प अधिकारी हरीचंद सरीयाम यांनी विद्यार्थ्यांना भविष्य वेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य कमल कापसे यांनी खेळासोबतच अभ्यासही अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले, या क्रिडा स्पर्धेचे संपूर्ण सुक्ष्म नियोजन प्रकल्प क्रीडा समन्वयक तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय मेश्राम यांनी केले तसेच क्रीडा स्पर्धेत देवरी पंचायत समिती सभापती अंबिका बंजार, पंचायत समिती सदस्य वैशाली पंधरे, पोलिस पाटील सुभाष अंबादे,तंटा मुक्ती अध्यक्ष कैलास वैद्य, प्रकल्प स्तरीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रभु कळंबे, प्राचार्य मदन भोवते, प्राचार्य प्रभाकर चोपकर, प्राचार्य नरेंद्र भाकरे, प्राचार्य हरीभाऊ किरणापुरे, प्राचार्य चांदेवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.के.सोनेवाने, कार्यालयीन अधीक्षक सुनील मेंढे, बोकडे,शिक्षण विस्तार अधिकारी भुसारी, पाळेकर, देशमुख,गाते, मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ शितल गंडागडे उपस्थित होते.संपुर्ण प्रकल्पातील क्रीडा शिक्षक खुणे, नेताजी गावढ, कमलेश बारेवार, सुरेश शहारे, विजय टेंभरे, प्रा.राजेश हट्टेवार, कमल चव्हाण यांनी यशस्वी रित्या स्पर्धा पार पडल्या,या स्पर्धेची सुरुवात विविध रंगारंग कार्यक्रमाने झाली त्यामध्ये गोंडी न्यृत्य व मराठी लावणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैयजंती नेनावत तर आभार प्रदर्शन माया बोपचे यांनी केले