हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

नागपुर – पोलीस स्टेशन पारडी, नागपूर शहर अपराध क्रंमाक 84/2022 कलम 302 भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीने मृतक इसम नामे सोनु काशीराम
बंसकर वय 40 वर्ष रा. इटारसी मध्येप्रदेश याचा डोक्यात सिमेंट ब्लॉक टाकुन खुन केल्यावरून नमुद गुन्हा पारडी येथे नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा गुन्हेशाखा युि नट क्रं.05, नागपूर नी घटनेचेगांभीर्य लक्षात घेता तात्काळ संमातर तपास सुरू करून गुन्हयातील अज्ञात पाहिजे आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय माहिती वरून नमुद गुह्यतील संशयीत आरोपी हा नाका नं.05, जायस्वाल दारू भट्टी पारडी येथे असल्याचे खात्रीसर बातमी मिळाल्यावरून गुन्हेशाखा शाखा युनिट क्र 05 चे अधिकारी/अंमलदार सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन शिताफीने संशयीत इसम ताब्यात घेवुन त्याचा त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव दामोधर मनोहरराव दासरथीवार वय 45 रा. अंबने गर, पावर हाउसचे मागे, दाल मील जवळ, पोस्टे पारडी नागपुर शहर असे सांगीतले. तसेच त्याच्याकडे कौशल्यपुर्वक पारडी येथील अप क्र. 84/2022 कलम 302 भादंवि बाबत विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली अधिक चौकशी केली असता मयत नामे सोनु काशीराम बंसकर वय 40 याचेसोबत आरोपी दामोधर मनोहरराव दासरथीवार याचे गादीवर झोपण्याच्या कारणावरून दि. 19/03/2022 रोजी पहाटे भांडण झाले होते. सदर भांडणाच्या रागातुन आरोपीने मयताच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक टाकुन खुन केल्याचे सांगीतले.
सदरची कामगिरी  चिन्मय पंडीत, पोलीस उपायुक्त(डिटेक्षन) व रोशन पंडीत, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक मुकुंदा सांळुखे यांचे नेतृत्वात सपोनि रियाज मुलानी, सपोनि संकेत चौधरी, पोलीस अमलदार दिपक कारोकार, श्रीकांत साबळे, पंकज लांडे, दिनेश चाफलेकर, सुरज भारती, चंदु ठाकरे, अनिल बावणे, आशिष देवरे, हिमांशु ठाकुर, साईनाथ दब्बा, उत्कर्ष राउत व चालक नासीर शेख व गोपाल यादव यांनी पार पडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुस्लिम बांधवांनी पोलिसांना सहकार्य करत शब-ऐ-बारात सण शांततेत पार पाडला

Sun Mar 20 , 2022
– पोलीस उपायुक्त , गजानन राजमाने यांनी 15 गोरकुनांना प्रशंसापत्रे देवून त्यांचा सत्कार केला. नागपुर – मुस्लिम बांधवाचा शब-ऐ-बारात हा सण सगळीकडे साजरा झाला. नागपूर मधील करकज मजलीस मुस्लिम कब्रस्तान, मोमीनपुरा येथे या निमित्ताने सुमारे एक लाख मुस्लिम नागरीकांनी आपले पुर्वजांचे कबरीवर नमाज पठण केले. सदर वेळी पोलीस उपायुक्त, परिमंडळ 3 यांच मार्गदर्शनाने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या सणा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!