मनपाने सुरू केले ‘थ्री आर’ सेंटर, केंद्र सरकारचा ‘२१ दिवस चॅलेंज’ उपक्रम

चंद्रपूर :- केंद्र सरकारने ‘२१ दिवस चॅलेंज’ या अभिनव उपक्रमांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ३ ‘थ्री आर’ सेंटर सुरु करण्यात आले असून यातील पाण्याच्या टॉकीजवळ मनपा पाणी पुरवठा विभाग येथील ‘ थ्री आर ’ सेंटरचे उदघाटन २० मे रोजी उपायुक्त अशोक गराटे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

केंद्र सरकारने ‘२१ दिवस चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम दि.१५ मे ते ०५ जून या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले असून यामध्ये ‘थ्री आर’ ही मुख्य संकल्पना आहे. ‘थ्री आर’ अर्थात – कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) असून या उपक्रमातर्गत शहरामध्ये ‘थ्री आर’ सेंटर्स सुरु करणे व नागरिकांच्या सहयोगातून विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे.

यात आपण जेवढा कचरा निर्माण करतो त्यात कपात करणे, ज्या गोष्टी फेकल्या गेल्या असत्या त्या वापरण्याचे नवीन मार्ग शोधणे तसेच जुने आणि निरुपयोगी (जसे प्लास्टिकच्या वस्तु ) काहीतरी नवीन आणि उपयुक्त (जसे पिकनिक बेंच, खेळाच्या मैदानाची उपकरणे आणि रीसायकलिंग बिन) मध्ये बदलणे हा ३ आर संकल्पनेचा उद्देश आहे.

याप्रसंगी उपायुक्त यांनी ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर’ हे घोषवाक्य घेऊन केंद्र सरकारमार्फत ‘21 डेज् चॅलेंज – ‘थ्री आऱ’ हा उपक्रम जाहीर केला गेला असुन उपक्रमांतर्गत नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, सफाईमित्र, बचतगट, TULIP INTERNS, प्रसारमाध्यमे यांचा मोठया प्रमाणावर सहभाग घेतला जाणार असून उपक्रमाशी सुसंगत विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे. यावेळी पर्यावरणाकरिता सुयोग्य जीवनशैलीची शपथ सामुहिकरित्या घेण्यात आली.

या सेंटरवर चांगल्या स्थितीतील कपडे, चादर, ब्लँकेट, भांडी,पुस्तके,खेळणी,पादत्राणे व इतर वस्तु या केंद्रात आणुन देता येतील तसेच गरजू व्यक्तींना नेता येतील. या मोहीमेत चांगले कार्य करणाऱ्या नागरीकांना बेस्ट सिटीझन पुरस्कार व प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. तसेच लकी ड्रॉ काढून विजेत्यांना बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत. अधिक माहीतीसाठी ‘ थ्री आर सेंटर ‘ प्रिंयदर्शिनी सभागृहाच्या मागे,पाणीची टाकी येथे ७८८८७९९८१, मुल रोड इंदिरा नगर येथे ७०८९८३९५२५,तसेच बेघर निवारा केंद्र आझाद गार्डन येथे संपर्क साधता येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधानांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे केले अनावरण

Sat May 20 , 2023
मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले. जपानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार आणि संसद सदस्य नाकातानी जनरल, हिरोशिमा शहराचे महापौर काझुमी मात्सुई, हिरोशिमा सिटी असेंब्लीचे अध्यक्ष तात्सुनोरी मोटानी, हिरोशिमा येथील संसद सदस्य आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी; भारतीय समुदायाचे सदस्य; आणि जपानमधील महात्मा गांधींचे अनुयायी आदी मान्यवर अनावरण सोहळ्याला उपस्थित होते. पंतप्रधानांचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com