– शहर नियंत्रण समिती अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी कार्यरत
चंद्रपूर :- आज १९ सप्टेंबर पासुन श्रीगणेशाचे आगमन होणार असुन गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असुन मनपातर्फे विसर्जनासाठी २५ कृत्रिम तलाव व १५ निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आले आहे.
शहरात मुख्यतः दीड दिवस, ५ दिवस तसेच १० दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जनाच्या व्यवस्थेची गरज भासते. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे.
नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती या कमी उंचीच्या ठेवण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन मनपामार्फत आधीच करण्यात आले होते. मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
३ फिरते विसर्जन कुंड –
गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ३ ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत.
स्पर्धा –
पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात यआली आहे यात सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपातर्फे देण्यात आलेल्या विषयांवर सजावट/देखावा करणे तसेच सार्वजनिक जागा सौंदर्यीकरण करणे अपेक्षित असुन यात १ लक्ष, ७१ हजार,५१ हजार रुपयांची तसेच टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु बनविणाऱ्यास २१ हजार व २१ हजार रुपयांची प्रोत्साहनपर १० पारितोषिक दिले जाणार आहेत.
एकल खिडकी योजना –
मनपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात आली असुन याअंतर्गत पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता येतात. यानुसार १८० सार्वजनिक गणेश मंडळांनी आतापर्यंत परवानगीसाठी अर्ज केला असुन ८० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.
पीओपी मुर्तींवर वॉच –
शहरात एकही पीओपी मूर्तीची स्थापना आणि विक्री होणार नाही, यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असुन झोननिहाय पथकांची नियुक्ती करून प्रत्यक्ष आणि गुप्त पद्धतीने तपासणी केली जात आहे. मातीच्या मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तीकारांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यावर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या असुन पीओपी मूर्तीची विक्री, आयात आणि निर्मिती करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल होणार आहे.
कृत्रिम तलाव स्थळ
१) झोन क्र. १ (कार्यालय) – २
२) साईबाबा मंदीर – १
३) दाताळा रोड,इरई नदी – २
४) तुकुम प्रा.शाळा(मनपा,चंद्रपूर) – २
५) नटराज टॉकीज (ताडोबा रोड) – २
६) रामाळा तलाव – ४
७) शिवाजी चौक – २
८) गांधी चौक – १
९) लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड – १
९) विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड – १
१०) महाकाली प्रा.शाळा – १
११) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ – २
१२) झोन क्र. ३ (कार्यालय) – २
१३) लालपेठ ( हनुमान मंदिर ) जुनी बस्ती -१
१३)पठाणपुरा गेट – १
एकूण – २५
निर्माल्य कलश
1) झोन क्र. १ (अ) – ५
2) झोन क्र. १ (ब) – १
3) झोन क्र. २ (अ) – ८
४) झोन क्र. ३ (ब) – १
५) झोन क्र. ३ (अ) – ३
६) झोन क्र. ३ (क) – २
एकूण – १५