कामचुकारपणा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मनपाचे भरारी पथक ठेवणार नजर

– मनपा वैद्यकिय आरोग्य विभागातर्फे पाच भरारी पथके तयार

नागपूर :- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC), आयुष्मान आरोग्य मंदिर या केंद्रावर वेळेवर उपस्थित न राहणारे, रीतसर सुट्टीचे अर्ज मंजूर न करता सुट्टी घेणारे, कामचुकारपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर नागपूर महानगरपालिकेचे भरारी पथक नजर ठेवणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC), आयुष्मान आरोग्य मंदिर या केंद्रातील अनियमितता दूर करण्यासाठी तसेच केंद्राची तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी नागपूर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागातर्फे पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या देखरेखीखाली मनपा वैद्यकिय आरोग्य विभागातर्फे पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहे. मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, प्रजनन एंवम बाल कल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, साथ रोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, युपीएचसी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश भूरे हे या पाच भरारी पथकाचे नेतृत्व करणार आहेत.

मनपाच्या दहाही झोननिहाय असणाऱ्या युपीएचसी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी केंद्रात वेळेवर उपस्थित राहतात किंवा नाही. सुट्टीवर असतांना रीतसर सुट्टीचे अर्ज मंजूर करुन घेतात किंवा नाही, कामात हलगर्जीपणा, वेळेवर उपस्थित न राहणे, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणे, कामात दिरंगाई करणे, सोपवलेले काम विहित मुदतीत न करणे, परवानगी शिवाय गैरहजर राहणे, दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणे आदी विविध बाबींची तपासणी करुन हे भरारी पथक वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करेल.

आतापर्यंत जवळपास १७ विविध दवाखान्यात या भरारी पथकाने भेट दिली असून, आवश्यक ती माहिती गोळा केली आहे. तसेच दवाखान्याच्या वेळेवर उपस्थित न राह‌णारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्तीचे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. सलग तीन दिवस उशिरा येणाऱ्या कर्मचायांना १ दिवसांची किरकोळ रजा कपात करण्याची सूचना देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाच्या कामचुकार अधिकाऱ्यांकडून वसूल करा रस्ते दुरुस्तीचे खर्च

Sun May 12 , 2024
– रस्ते खोदकामाबाबत आमदार विकास ठाकरे यांचा मनपा आयुक्तांना इशारा – महानगरपालिकेला नागरिकांच्या जीवाशी खेळ करु देणार नाही नागपूर :- शहरात गेल्या वर्षभरापासून नुकतेच तयार केलेले आणि अनेक सुस्थितीत असलेले रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. दरम्यान रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाय योजना करण्यात येत नाही आहे. तसेच कंत्राटदार कंपनी खोदलेली माती, पाईप असा साहित्य रस्त्यावर सोडून पळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com