– मनपात बीआयएस जागरूकता चर्चासत्र
नागपूर :- भारतीय मानक ब्युरो यांच्या मानक चिन्हांशिवाय तयार केली आणि विकली न जाऊ शकणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (ता.१७) रोजी जाणून घेतली. याप्रसंगी राजकुमार मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, भारतीय मानक ब्युरोचे सहायक संचालक पियुष वासेकर, सर्वेश त्रिवेदी, इशा खुराना यांच्यासह नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थिती होते.
भारतीय मानक ब्युरो यांच्याद्वारे वस्तुंचे मानकीकरण, चिन्हांकन आणि गुणवत्ता प्रमाणीकरणाच्या क्रियाकलापांच्या सुसंवाद विकासासाठी नागपूर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना भविष्यात दर्जेदार उत्पादनांच्या टेंडर्स संदर्भातील विविध कामांमध्ये मदत प्राप्त होईल. या दृष्टिने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
चर्चासत्र दरम्यान भारतीय मानक ब्युरोचे सहायक संचालक पियुष वासेकर, सर्वेश त्रिवेदी यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. तसेच बीआयएस द्वारा ग्राहकांसाठी तयार केलेल्या बीआयएस केअर अँप बद्दल माहिती दिली. याशिवाय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विविध शंकांचे निराकरण करून दिले.