नागपूर :- मनपा मालकीच्या जागेवरील झोपडीधारकांकडून दस्तावेज गोळा करून घेण्याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे नवीन फुटाळा येथील समाजभवन परिसरात पट्टेवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरूवारी (ता.२) भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, नोंदणी व मुद्रांक विभागाचे सहसंचालक तानाजी गंगावणे, दुय्यम निबंधक वीरेंद्र धनविजय, वरिष्ठ लिपिक संगीता वाघ, मनपाच्या धरमपेठ झोनचे सर्वश्री स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (झोपडपट्टी पट्टेवाटप कक्ष) प्रेमानंद मोटघरे, उपअभियंता विलास जुनघरे, कनिष्ठ निरीक्षक मनोज शाहु, कर निरिक्षक राजु मालिकर, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या गीता राऊत, परिसरातील रहिवासी साहिल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पट्टे वाटपासाठी आवश्यक दस्तावेज गोळा करण्यासंदर्भात प्रक्रिया जाणून घेतली. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या सर्व शिबिर स्थळी येणा-या नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करा, असे निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले. आवश्यक कागदपत्रांची योग्यरित्या पडताळणी करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्ततेसंदर्भात नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्याबाबत देखील त्यांनी सूचित केले.
यापूर्वी धंतोली झोन अंतर्गत रामबाग येथे व तकीया येथील सरस्वती नगर येथे मनपा मालकीच्या जागेवरील झोपडीधारकांकडून दस्तावेज गोळा करून घेण्याकरिता शिबिर घेण्यात आले आहेत.
पट्टेवाटप करीता लागणारी आवश्यक कागदपत्रे
१) १ जानेवारी २०११ पूर्वीचा खालीलपैकी कोणताही एक पुरावा
(a) मतदार ओळखपत्र
(b) विज बिल
(c) कर पावती
२) २०२३-२४ चा खालीलपैकी कोणताही एक पुरावा
(a) विज बिल
(b) कर पावती
३) कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
४) नवीन भरलेली कर पावती
५) जात प्रमाणपत्र
६) जातीचे प्रमाणपत्र नसल्यास उत्पन्नाचा दाखला
७) बीपीएल रेशन कार्ड
८) पती पत्नीचे फोटो – २
येथे होणार शिबिर (वेळ – दुपारी १२ ते सायंकाळी ५)
दि. ६/११/२०२३ ते ७/११/२०११ – मधु कांबळे समाज मंदिर, शिवाजी नगर
दि. ९/११/२०२३ ते १०/११/२०२३ – लाल शाळेजवळील समाज मंदिर, भुतेश्वर नगर
दि. २०/११/२०२३ – रा.बा. कुंभारे समाज भवन, चिमाबाई पेठ
दि. २१/११/२०२३ – शितला माता मंदिर, शोभाखेत
दि. २३/११/२०
२३ ते २४/११/२०२३ – शिलगंध बौद्धविहार, कुंभारटोली/गुजर नगर