मनपा आयुक्तांनी दिला दिव्यांगांना आपुलकीचा हात

जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची दिली हमी : अर्थसहाय्य योजनेतून धनादेश वितरीत

नागपूर : मनपासह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना लाभ मिळवून देउन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रशासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल असा विश्वास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर शहरातील दिव्यांगांना आपुलकीचा हात दिला.

            बुधवारी (ता.१६) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी समाजविकास विभागांतर्गत वैयक्तिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत २५ दिव्यांगांना २३ लक्ष ७५ हजार रुपयांचे धनादेश प्रतिकात्मक स्वरूपात प्रदान केले. सर्व दिव्यांगांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ९५ हजार रुपये विभागाद्वारे जमा करण्यात आले.

            मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, उपायुक्त विजय हुमने, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर आदी उपस्थित होते.

            यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी तुळशीरोप देउन पात्र लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्याशी संवाद साधला. प्राप्त अर्थसहाय्यातून योग्य स्वयंरोजगार स्थापित व्हावा यासाठी समाजविकास विभागाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण घेउनच आपला रोजगार उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना मनपाच्या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. मात्र अर्थसहाय्य योजनेद्वारे २०० जणांना लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत ७५ लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून उर्वरित १२५ जणांना तातडीने अर्थसहाय्य मिळावे यासाठी गतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय इतर दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी इतर योजनांचा अभ्यास करून त्याद्वारेही लाभ मिळवून देण्याबाबत त्यांनी विभागाला सूचना केली. दिव्यांगांच्या समस्या, त्यांच्या अडचणी लक्षात घेउन त्यांना मिळणा-या लाभातून योग्य रोजगार उभारला जावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणे, वेळोवेळी संवाद सत्र आयोजित करण्याचीही सूचना त्यांनी केली.

उपायुक्त विजय हुमने यांनी समाजविकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या योजना, त्याद्वारे देण्यात आलेले लाभ आदींची माहिती दिली.

पात्र लाभार्थी

जितेंद्र सिरसीकर, पीयूष गवळी, प्रकाश लिचोडे, अनिल फंदे, संदीप शेवरन, रोशन वैरागडे, हरप्रितसिंग धत, मनोज धोटे, जितेंद्र सोमकुवर, ओमप्रकाश मोहारकर, मनोज सोनटक्के, राम चंदनखेडे, राजेश नानेटकर, व्यंकट मराठे, रवी सुरास्कर, श्यामसुंदर देवीकर, गौरव सोनभद्रे, किशोर बागडे, रजत खोब्रागडे, मनीष भगत, मो. शोयब, रितेश गजभिये, पवन काळबांडे, दीप पाटील, धर्मा पदवार या २५ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ९५ हजार रुपये अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येड पांघरूण पेडगावला जायचं होतं' की त्यांचा 'अभ्यास कमी होता' म्हणून अर्थसंकल्पावर टिका;अजित पवारांचा विरोधकांना टोला...

Thu Mar 17 , 2022
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा ;आमदारांना ५ कोटीचा विकासनिधी तर स्वीय सहायक व चालकांचे पगार वाढवले… मुंबई  – इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लगावला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com