मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई :- ‘अंत्योदय’ संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अंत्योदय’ दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘पंडित दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना मांडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा ध्यास घेतला. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्यासाठी आपण एकजुटीने काम करूया, हेच त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन ‘, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सत्यशोधक स्थापना दिनाचे स्वागत व पुणे कराराचा धिक्कार केला बसपा ने

Mon Sep 26 , 2022
नागपूर :- आजपासून दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी शूद्रांना (ओबीसी) प्रस्थापित (ब्राम्हण, भट,जोशी, उपाध्ये) व त्यांच्या मतलबी धर्मग्रंथांच्या मगर मिठीतून (दास्यत्वातून) सोडविण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या स्थापना दिनाचे बसपा ने स्वागत केले. तसेच 24 सप्टेंबर 1932 ला डॉ. आंबेडकरांना इंग्रजांकडून मिळालेल्या दलितांच्या राजकीय हक्क अधिकाराला पुणे करारच्या माध्यमातून गांधीजी द्वारा आमरण उपोषण करुन छिनण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!