खासदार क्रीडा महोत्सव,रस्सीखेचमध्ये महाराष्ट्र विद्यालय ‘चॅम्पियन’

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रेशीमबाग मैदानात झालेल्या रस्सीखेच स्पर्धेच्या अंतिम लढतीत सीनिअर पुरूष गटात कामठी येथील उमीराज अकादमी संघाने आणि महिला गटात एम.व्ही.के. स्पोर्टिंग क्लबने अजिंक्यपद पटकाविले.

१४ वर्षाखालील मुली आणि मुलांमध्ये बी.के.सी.पी. स्कूल आणि महाराष्ट्र विद्यालय तर १७ आणि १९ वर्षाखालील वयोगटात मुले आणि मुलींमध्ये खापरखेडा येथील महाराष्ट्र विद्यालयाचे संघ चॅम्पियन ठरले.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते विजयी चषक आणि रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाला उद्घाटन समारंभाला स्पर्धेचे कन्वेनर नागेश सहारे, समन्वयक नितीन शिमले, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ.पीयूष आंबुलकर, ज्योती देवघरे, सतीश वडे, श्रीकांत आगलावे, सचिन कावळे, प्रभाकर क्षीरसागर, अशोक चव्हाण, धनराज शिवरकर, प्रा. किशोर पाटील आदींची उपस्थिती होती.

निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)

सीनिअर पुरूष

उमीराज अकादमी कामठी, महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा, अंजुमन सीनिअर कॉलेज नागपूर

सीनिअर महिला

एम.व्ही.के. स्पोर्टिंग क्लब, तायवाडे कॉलेज कोराडी, उमीराज अकादमी कामठी

१४ वर्षाखालील – मुली

बी.के.सी.पी. स्कूल, उमिराज ॲकेडमी, महाराष्ट्र विद्यालय

मुले

महाराष्ट्र विद्यालय, वालनी हायस्कूल, एम.व्ही.के. स्पोर्टिंग क्लब.

१७ वर्षाखालील – मुली

महाराष्ट्र विद्यालय, बी.के.सी.पी. स्कूल, ग्रेट ब्रिटेन स्कूल नागपूर

मुले

महाराष्ट्र विद्यालय, बी.के.सी.पी-I स्कूल, बी.के.सी.पी-II स्कूल

१९ वर्षाखालील – मुली

महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा (प्रथम), राम गणेश गडकरी कॉलेज, सावनेर (द्वितीय)

मुले

महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा, एम.व्ही.के. स्पोर्टिंग क्लब खापरखेडा, वालनी हायस्कूल वालनी

 

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इमारती, झाडे, इलेक्ट्रिक पोलवर अडकलेला मांजा काढा, अनर्थ टाळा - मनपाचे नागरीकांना आवाहन 

Wed Jan 18 , 2023
– व्हॉटसॲप क्र. 8600004746 वर कळवा. नागपूर : शहरात मकरसक्रांतीचा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त शहरात पतंग उडविण्यात आल्या, यादरम्यान शहरातील झाडे, इमारती, विद्युत खांब, विद्युत तारेवर मांजा अडकलेला असतो. हा मांजा पक्ष्यांसाठी तसेच व्यक्तींसाठी घातक ठरू शकतो. मांजात अडकून कुठलाही अनर्थ होऊ शकतो, हाच अनर्थ टाळण्यासाठी, झाडे, इमारती, विद्युत खांब, विद्युत तारेवर अडकलेला मांजा काढण्यासाठी शहरातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com