मौदा :- दिनांक ०८/०८/२०२३ रोजी पोलिस स्टेशन मौदा येथील स्टाफ पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, माथनी टोल नाका येथे कच्या रंगाचा आयसर सहा चक्का ट्रक क्र. एम. एच. ३४ / ए. व्ही. १२०४ मध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबुन नेत आहेत. अशा माहिती वरून टोलनाका माथनी येथे नाकाबंदी करीत असता कथ्थ्या रंगाचा आयसर सहा चक्का ट्रक क्र. एम. एच.- ३४ / ए. व्ही. – १२०४ येतांनी दिसला असता थांबण्याचा इशारा केला गाडी थांबवली व वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनात आरोपी नामे- १) मोहम्मद तौसीफ शेख, रा. अडवाळ ता. पवनी जि. भंडारा २) सोहेल सुभान पठान, रा. अडवाळ ता. पवनी जि. भंडारा ३) आतिक साबीर शेख रा. अडवाळ ता. पवनी जि. भंडारा यास ताब्यात घेवून सदर आयसर सहा चक्का ट्रक गाडी तपासले असता वाहनात पांढरा लालसर भुरकट रंगाचे लहान मोठे एकूण २५ गोवंश जनावरे प्रत्येकी किमती १५०००/- प्रमाणे ३,७५,०००/- चा गोवंश त्यांच्या शिंगाला पायाला तोंडाला दोरीने बांबुन निर्दयतेने कोबुन कोणत्याही प्रकारची चारापाण्याची व्यवस्था न करता उपासमारीने व्याकुळ होतील अशा स्थितीत कतलीकरीता घेवुन जात असल्याने पांढरा लालसर भुरकट रंगाचे लहान मोठे एकुण २५ गोवंश जनावरे प्रत्येकी किंमती १५०००/- प्रमाणे ३,७५,०००/-रु. चा गोवंश जनावरे निर्दयतेने वाहतुक करतांना मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातून आयसर सहा चक्का ट्रक क्र. एम. एच.- ३४ / ए.व्ही. – १२०४ किंमती अंदाजे ६,००,०००/- रु. असा एकूण ९,७५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून गोवंश यांना देखभालीकरीता गौरक्षण संस्था खैरी पिपळगाव ता. लाखनी येथे पोहचवण्यात आले.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे रोशन पाटील पोस्टे मौदा यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीताविरुद्ध कलम कलम ११ (१) (ड) ५ ए. ९ प्राणी संरक्षण कायान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीतांना सुचनापत्रावर सोडण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक भुते या करीत आहे.