छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमशी होणार सांमजस्य करार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :-  छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले आहेत. दि.3 ऑक्टोबर,2023 रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत या करारावर स्वाक्षरी होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षात वाघनखे शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने सांमजस्य करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी काढले. यावेळी आमदार पराग अळवणी, ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका उपस्थित होते.

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दि. 15 एप्रिल, 2023 रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उपउच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय सबंध उपप्रमुख इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Mon Oct 2 , 2023
सावनेर :- दिनांक २७/०९/२०२३ च्या १९.०० वा. ते २०.०० वा. सुमारास पो.स्टे. सावनेर फिर्यादी ही दिनांक २७/०९/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. सुमारास कामावर गेली असता फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १७ वर्ष ७ दिवस ही घरी एकटीच होती. फिर्यादीचा भाऊ व पत्नी हे दुपारी ०२.३० वा. घरी आले असता घराला कुलूप लागलेले होते असे त्याने फिर्यादीला फोनवर सांगितले फिर्यादीला वाटले की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!