संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पवित्र रमजान चा महिना हा मुस्लिम समाजबांधव अत्यंत महत्वाचा महिना म्हणून साजरा करतात. या रमजान महिन्याची इस्लाममध्ये आपली अशी एक वेगळी ओळख आहे.कामठी शहरातील बहुतांश चिमुकल्यानी रमजानचे रोजे ठेवले आहेत.
इस्लाम धर्माच्या पाच महत्वाच्या आचरणांपैकी रोजा हा महत्वाचा घटक आहे.त्यात रमजान महिन्याच्या रोज्यांना विशेष महत्व आहे.शुक्रवार 24 मार्च पासून रमजान चे रोजे ,प्रार्थना आणि कुराण पठण करण्यास प्रारंभ झाला असून दिवसभर काहीही न खाता पिता रमजान चे रोजे म्हणजेच उपवास करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.संध्याकाळी सुर्यास्तानंतर ते मोठ्याप्रमाणेच रोजा सोडतात.
रोजा सुटतो त्याला इफ्तार असे म्हणतात इफ्तारच्या वेळेस प्रार्थना करून आधी खजूर आणि त्यानंतर विविध फळ खाऊन ते रोजा सोडतात . रात्री उपवास सोडल्यानंतर पुन्हा सकाळी सुर्योदया पूर्वी सहरी करून पुन्हा दिवसभराच्या अत्यंत कडक रोजाला म्हणजेच उपवासाला ते सुरुवात करतात. एप्रिल महिना उन्हाळ्याचा कडक महिना असतानाही मुस्लिम समाजातील अनेक लहान मुले रमजान महिन्यातले रोजे अत्यंत कसोशीने पाळत आहेत.
-रमजानमध्ये जकातीलाही महत्व
– रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव संपूर्ण दिवसभर काहीही न खाता पिता फक्त अल्लाहची ईबादत करतात .यासोबतच तरावीहची नमाज व कुराण शरीफचे पठण केले जाते .रमजान मध्ये जकातीलाही अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. जकात म्हणजे आपण मेहनत करून कमावलेल्या पैशातला काही भाग गरिबांसाठी किंवा गरजूंसाठी दान करणे होय.