संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक माजी प्राचार्य डॉ रतनलाल पहाडी यांचे वयाच्या 99 व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सकल जैन समाज बांधवासह समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
अंत्यदर्शन घेणाऱ्यामध्ये माजी मंत्री सुनील केदार, माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे,रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जी प अध्यक्ष मुक्ता कोकुर्डे,जी प उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे, प्रसन्ना तिडके, कांग्रेस कामठी शहराध्यक्ष रमेश दुबे,माजी नगराध्यक्ष नीरज यादव,माजी नगरसेविका वैशाली मानवटकर,लक्ष्मण संगेववार, आदी गणमान्य नागरिकांसह नायब तहसीलदार अमर हांडा, प्रशासक संदीप बोरकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सिंग आदी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मात्र दरम्यान या मतदार संघात भाजप चे चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर हे दोन आमदार असूनही यातील एकही आमदार या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही यामध्ये आमदार बावनकुळे यांच्या मातोश्री चे चौदावी चा कार्यक्रम असल्याने बावनकुळे अपवाद ठरू शकतात मात्र आमदार टेकचंद सावरकर यांची अनुपस्थिती नोंद करण्यात आली इतकेच नव्हे तर भाजपचे बोटावर मोजणारे दोन चार कार्यकर्ते सोडले तर भाजप चे बहुतांश पदाधिकारी ,कार्यकर्ते या अंत्यसंस्कार कार्यक्रमात न दिसल्याने शहरातील इतकी मोठे दिग्गज व्यक्तीमत्त्व असलेले स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात दांडी मारल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत याबाबत शोकांतिका व्यक्त करण्यात येत होती.
याप्रसंगी कामठी येथील जैन समाज भवन सभागृहात असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ रतनलाल पहाडी यांच्या पार्थिवावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ध्वज लपेटून व पुष्पचक्र अर्पण करून पोलीस दलाने शोकधून वाजवून मानवंदना दिली.ही अंत्ययात्रा आजनी नवीन कामठी मोक्षधाम येथे पोहोचताच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी पोलीस दलाने त्यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज काढून जैन सकल समाजाचे मान्यवर प्रतिनिधी आशिष जैन यांच्याकडे सुपूर्द केला. पोलीस दलाने बंदुकीच्या तीन फेऱ्या झाडून शोकधून वाजवून मानवंदना दिली.तसेच याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ रतनलाल पहाडी यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.शोकसभेचे संचालन आशिष जैन यांनी केले.