गौरी गणपती उत्सवानिमित्त १ कोटी ७० लाखापेक्षा जास्त  शिधापत्रिकाधारकांना मिळणार “आनंदाचा शिधा”

मुंबई :- यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या “आनंदाचा शिधा” संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे. “आनंदाचा शिधा” संच्याचे वाटप दि १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा मिळणार आहे.

प्रती शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी ५६२.५१ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

KARGIL VIJAY DIWAS CELEBRATION AT NCC GROUP HQ NAGPUR

Sat Jul 27 , 2024
Nagpur :-NCC Group HQ observed Kargil Vijay Diwas with solemnity and pride, honoring the valour of soldiers who fought in the Kargil War. The solemn occasion was marked by a wreath laying ceremony at the War Memorial at HQ Maintenance Command, IAF on 26 Jul 24 by Group Captain Kushal Vyas, Group Commander NCC GP, Nagpur. NCC cadets of Army, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!