भाजपा वैद्यकीय आघाडी द्वारे मोदींच्या वर्धापनदिनी आरोग्य सेवा शिबीर उत्साहात संपन्न..

नागपूर :- भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर व डायग्नो प्लस पॅथॉलॉजी द्वारे नागरिकांसाठी आरोग्य व सेवा शिबिराचे शनिवारी डायग्नो प्लस, गिरीपेठ ,(धरमपेठ), नागपूर येथे आयोजित करण्यात आले 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मध्ये एकूण 72 शिबिराचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी राज्यसभा खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या शुभहस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा नागपूर शहर अध्यक्ष  आमदार  प्रवीण दटके, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार  सुधाकरराव देशमुख, संजय बंगाले, महामंत्री भाजपा नागपूर,सुनिल हिरनवार माजी नगरसेवक, महामंत्री  अनिरुद्ध पालकर,वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. गिरी्श चरडे, आदी मान्यवर आणि 300 हुन अधिक नागरिक उपस्थित होते. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना आरोग्य स्वच्छतादूत सन्मान करण्यात आला.

नरेंद्र मोदी हे युगपुरुष असून आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत असे प्रतिपादन माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी केले. नरेंद्र मोदी या विषयावर डॉ विकास महात्मे यांनी विचार प्रकट करून मोदींची जीवन शैली, राष्ट्रभक्ती, सेवाकार्य, ऍडमिनिस्ट्रेशन आदी पैलुंवर नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ श्रीरंग वराडपांडे यांचे तर आयोजन डायग्नो प्लस चे संचालक  राकेश कोणतमवार यांनी केले. या शिबिरात ऑर्गन डोनेशन जनजागृती, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, रक्तदान निशुल्क ,ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, नेत्र तपासणी, दंत तपासणी करून रुग्णांना नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात आले. या सेवा कार्य शिबिराचा 300 हुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Sun Sep 18 , 2022
मुंबई :- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.ज. वळवी, वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com