नागपूर :- पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक २६ मधील विविध भागांमध्ये मंगळवारी (ता.२०) मोदी@9 जनसंपर्क अभियान राबविण्यात आला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर मोदी@9 हे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात मंगळवारी पूर्व नागपुरातील प्रभाग २६ मधील विश्वशांती नगर, माँ वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर, गोकलानी लेआउट या परिसरामध्ये मोदी@9 हे जनसंपर्क अभियान राबविण्यात आले.यावेळी प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, भूपेश अंधारे, नारायणसिंह गौर, सचिन भगत, प्रदीप गोसावी, ज्योती वाघमारे, कल्पना सारवे, राकेश टोंग, प्रकाश जवादे, दीनकर चाफले, सलीम अंसारी, राम सामंत यांच्यासह अनेक नागरिकांनी अभियानात सहभाग नोंदविला.
प्रभाग २६ मध्ये मोदी@9 जनसंपर्क अभियान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com