-शिवनाथ एक्सप्रेस मधील घटना
नागपूर –शिवनाथ एक्सप्रेमधून मोबाईल चोरणार्या चार आरोपींच्या आरपीएफच्या पथकाने मुसक्या आवळल्या. चौकशी करून चौघांनाही इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. ही घटना इतवारी रेल्वे स्थानकावर घडली.
18239 शिवनाथ एक्सप्रेसला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. ही संधी साधून चारही आरोपी प्रवाशांचे मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने आले. प्रवाशांचे खिसे चाचपत असतानाच कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक राहुलकुमार पांडे, आरक्षक प्रितमकुमार यांनी चौघांनाही रंगेहात पकडले. ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. झडती घेतली असता चारही आरोपीजवळ तीन मोबाईल मिळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच गोंदिया स्थानका जवळ जरनर कोचमधून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. कागदोपत्री कारवाईनंतर त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
@ फाईल फोटो