नागपूर :-दिनांक ०५.१०.२०२३ रोजी २०:३० वाजता चे सुमारास फिर्यादी संदेश विवेक विनक वय ३२ वर्ष रा. म्हाडा कॉलोनी, नरेन्द्र नगर, नागपूर वर्धा रोड, साईमंदिर येथे आपल्या पत्नीसह दर्शनासाठी गेले होते. साईं मंदिर समोरोल फुटपाथवर प्रसाद वाटपाच्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे फिर्यादी हे एकटेच प्रसाद घेण्यासाठी गेले. सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात चोराने २०:३० वाजता ते २१.१५ वाजता चे दरम्यान फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशात असलेला आयफोन १२. पांढया रंगाचा, किमती अंदाजे ४०,०००/-रू हा चोरून नेला. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो ठाणे धंतोली येथे कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धंतोली पोलीसांनी गुन्हयाचे तपासात चोरी गेलेला आय फोन १२ मोबाईल लोकेशन काढले असता ते मिलगाव, वांजरा वस्तीच्या मागील भागात येत असल्याने मोबाईल च्या लोकेशन वरून शोध घेवून घरमालक भिमराव जगन रोकडे, वय ४८ वर्ष, रा. रोकडे आटा चक्की ग्रामपंचायत जवळ जुनी वस्ती मिलगाव, ता. कामठी, यांना विचारपुस केली असता त्यांनी राहते घरी दुसऱ्या माळ्यावर बाहेरील राज्यातील मुले राहतात असे सांगीतले. पोलीसांना त्या मुलांवर संशय आल्याने पंच बोलावुन घरमालक यांचे समक्ष झडती घेतली घरझडती दरम्यान सदर घरात तीन आरोपी हे गुन्हयातील चोरी गेलेला आय फोन १२ तसेच इतर ७३ विवध कंपनीचे ओनरोईड मोबाईल फोन असा एकूण ८.१०,००० रुपयाचा मुद्देमालासह मिळुन आले. आरोपींना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) मोहम्मद शहबाज खान बल्द मोहम्मद अंसार खान वय २२ वर्ष रा मोती झरना, महाराजपूर, तलझारी, जि. साहेबगंज, झारखंड, २) मोहम्मद इरशाद बल्द मोहम्मद नौशाद अंसारी वय २४ वर्ष रा. महाराजपूर, जुना भट्टा, जि. साहेबगंज ३) शेख यावर शेख असलम वय २२ वर्ष ग. मोती झरना, महाराजपुर, तलझारी, जि. साहेबगंज, झारखंड, असे सांगीतले. मोबाइल बाबत आरोपींना विचारपुस केली असता आरोपींनी चोरी केल्याचे कबुली दिली. नमुद गुन्हयात कलम ३४ भादवि अन्वये कलम वाढ करण्यात आली. आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोउपनि धनराजा मारकवाड, हे करीत आहे.
वरील कामगिरी मा पोउपआ, परी क्र. ०२. नागपुर, सपोआ, सिताबर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली क्योंनि प्रभावती एकुरके, पोउपनि बनाजी मारकवाड, सुमेदकुमार जाधव, नापोअ सुभाष वासाडे, बाळू जाधव, प्रशांत इंगोले पोअ विनोद चव्हाण, माणिक दहिफडे, चेतन भोळे, विक्रम ठाकुर यांनी केली.