राजस्थान, मध्यप्रदेश छत्तीसगढ़ आणि तेलंगणा मध्ये विधानसभा निवडणुक निकाला बाबद संमिश्र प्रतिक्रिया

कन्हान :- राजस्थान,मध्यप्रदेश, छत्तीसगढ या तिन्ही राज्यात भाजपाला तर तेलंगाना कॉंग्रेसला बहुमत मिळाले याबद्दल कन्हान येथील विविध पक्षाचे पदाधिकारी याची प्रतिक्रिया दिली ज्यात

भाजप पारशिवनी तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्मे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या योजनामुळे तीन राज्यात जनतेने कौल दिले भाजप म्हणजे सत्य आहे आणि सत्याच्या मागे जनता उभी आहे आगामी लोकसभा निवडणुकी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सरकार येणार आहे .

तर कॉंग्रेसच्या माजी जि प अध्यक्षा व विद्यमान सदस्य रश्मी बर्वे यांनी सांगिलते की तेलंगानात कॉंग्रेस विजय मिळवला तर इतर तिन्ही राज्यात आलेला जनतेने भाजपला कौल जरी दिला असला तरी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस ताकतीने लढ़ेल व केंद्रात एनडीए आपले सरकार बनवेल

तसेच रिपब्लिकन भीमशक्तिचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी सांगितले की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत फरक असून लोकसभा निवडणुकीत सामान्य जनता माहगाई आणि बेरोजगार व खाजगीकरण आदि मुद्याला भाजपला समोर जावे लागेल .

तसेच आम आदमी पार्टीच्या जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर दारोडे यांनी सांगिलते की निकाल आश्चर्यजनक आहेत आणि लोकसभा निवडणूक बैलेट पेपरने घेण्यात यावी .

तसेच शिंदे गट शिवसेना नागपूर ग्रा. उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या योजनामुळे तीन राज्यात जनतेने बहुमत दिले. आता जनतेला माहीत झाले की आता देशाच्या विकासाकरीता काँग्रेसकडे कोणतेही नेतृत्व नाहीं ते नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे विकास करू शकतात आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आणि युतीचे सरकार येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदार यादी अधिक सुदृढ होण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे - विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी

Tue Dec 5 , 2023
भंडारा :- लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून या प्रक्रियेत कोणीही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी भारत निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील जिल्हा निवडणूक अधिकारी आपले स्तरावर प्रयत्न करत आहेत. मात्र राजकीय पक्षांनी देखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच शासनाच्या मतदार नोंदणी अभियानात सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com