तेलंगाणा एक्सप्रेसने अल्पवयीन मुलीचे अपहरण!

-संशय बळावला अन् अनर्थ टळला

-नागपूर रेल्वे स्थानकावर ताब्यात

-तेलंगाणा पोलिसांच्या स्वाधीन

नागपूर :- तेलंगाणा एक्सप्रेसने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळून जात असलेल्या युवकाला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्‍याचा केवळ संशय बळावला अन् संभाव्य धोका टळला. त्यांच्या सतर्कतेने ती सुखरूप आहे. अन्यथा पीडित मुलीचे काय झाले असते, याविषयी कल्पना न केलेलीच बरी.

लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरी (24) असे अपहरणकर्त्या युवकाचे नाव आहे. तो तेलंगाणाचा रहिवासी आहे. तो विवाहित असून, त्याचे 12 वीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने राणी (काल्पनिक नाव)ला आपल्या प्रेमात अडकविले आणि पळून जाण्याची योजना आखली. योजनेनुसार मंगळवारी सकाळी हैदराबादहून तेलंगाणा एक्सप्रेसने नागपूरसाठी निघाले. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आली. दोघेही रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबले.

यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक ऑज्वेल्ड थॉमस कर्तव्यावर होते. हरी आणि राणी यांच्यासाठी नागपूर नवीनच त्यांच्या भिरभिरत्या नजरा, हालचाली आणि त्यांच्यातील वयाचे अंतर यावरून थॉमस यांचा संशय बळावला. त्यांनी सहज म्हणून विचारपूस केली. मात्र, भाषेची अडचण होती. थॉमस यांनी लगेच एका व्यक्तीला बोलाविले. हरीला प्रश्न विचारल्यावर संशयास्पद वाटत असल्याचे संबंधित व्यक्तीने थॉमस यांना सांगितले. थॉमस यांनी दोघांनाही लोहमार्ग ठाण्यात आणले आणि पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांना या प्रकरणाची गंभीरता सांगितली. काशिद यांनी क्षणाचाही वेळ न घालवता गुगलवर सर्च करून संबंधित पोलिस ठाण्याचा फोन नंबर मिळविला. त्यांना हरीबद्दल माहिती दिली. तेलंगाणा पोलिसांचे उत्तर ऐकून लोहमार्ग पोलिसांना धक्काच बसला. एका अल्पवनीय मुलीचे अपहरण करून तो पळाला आहे. त्याला थांबवून ठेवा. तुमच्याकडे काहीच सुगावा नसताना त्याला कसे काय पकडले, यापूर्वीही त्याने त्याच मुलीचे अपहरण केले होते. या प्रकरणात तो कारागृहात होता. अशा माहितीवरून पोलिसांनी हरीला ताब्यात ठेवले आणि राणीला बालगृहात पाठविले. आज बुधवारी सकाळीच तेलंगाणा पोलिस आणि राणीचे नातेवाईक नागपुरात पोहोचले. तेलंगाणा पोलिस हरीला घेऊन तेलंगाणासाठी रवाना झाले.

उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या सूचना

लोहमार्ग उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत शिंदे मंगळवार, 11 एप्रिलला नागपूर लोहमार्ग ठाण्यात आले. त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांना विशेष सूचना दिल्या. अल्पवयीन मुलांचे प्रकरण हाताळताना योग्य ती काळजी घ्या. चौतर्फा नजर ठेवा. पीडितांना आधार द्या. शिंदे यांनी दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनामुळे थॉमस सतर्क झाले आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात यश मिळाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सराईत गुन्हेगार कुलदीप लखनसिंग बावरी व मयुर उर्फ एन. डी. कृष्णाजी राऊत यांना MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षाकरीता केले स्थानबध्द

Thu Apr 13 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :- पोलीस स्टेशन बुट्टीबोरी अंतर्गत येणान्या रूईखैरी परीसरात राहणारे सराईत गुन्हेगार कुलदीपसिंग लखनसिंग बावरी वय २७ वर्ष व मयुर उर्फ एन. डी. कृष्णाजी राऊत वय २९ वर्ष दोन्ही रा. रुईखेरी ता. जि. नागपूर हे मागील काही वर्षापासून साईखेरी व बुट्टीबोरी परिसरात गुंडगिरी करून तेथील नागरिकांना त्रास देत होते. ते नेहमी गुन्हेगारी कृत्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com