गुजरात विकास मॉडेल अभ्यासासाठी मंत्री गुजरातला जातात एवढी मोठी नामुष्की ईडी सरकारमुळे महाराष्ट्रावर आलीय – महेश तपासे

मुंबई :- गुजरात विकास मॉडेल अभ्यासासाठी राज्याचे वनमंत्री आणि उद्योगमंत्री गुजरातला जातात एवढी मोठी नामुष्की ईडी सरकारमुळे महाराष्ट्रावर आलीय अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

ईडी सरकारचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आणायची याचा अभ्यास करण्यासाठी गुजरातला जावं लागतं याच्यासारखे दुर्दैवी सरकार महाराष्ट्रात असूच शकत नाही असा जोरदार टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र हा गुंतवणूकदारांसाठी अव्वल नंबर राहिला आहे. देशात महाराष्ट्राचे आगळेवेगळे महत्त्व आहे. त्याच महाराष्ट्रात ईडीसरकार आल्यावर फॉक्सकॉनसारखा प्रकल्प, महत्वाची कार्यालये गुजरात पळवून नेते हीसुद्धा शोकांतिका आहे असेही महेश तपासे म्हणाले.

गुजरात हे सगळे नेत असताना राज्यातील भाजप नेते हतबलतेने बघत आहेत. राज्यातील नागरीकांना, उद्योगपतींना महाराष्ट्रावर विश्वास आहे मात्र सरकारची विश्वासार्हता काय असा सवाल उद्योगजगतातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्योतिराव फुले विज्ञानाचे पुरस्कर्ते;आजच्या काळातही समाजाच्या उभारीसाठी महात्मा फुले यांचे विचार अतिशय उपयुक्त - शरद पवार

Tue Sep 27 , 2022
महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाजाचे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्यासाठी प्रयत्न करावे… सत्यशोधक समाजाचे विचारच देशाला जातीपातीच्या व धर्मभेदाच्या यादवीतून वाचवू शकतात – छगन भुजबळ देशात फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे शरद पवार हे एकमेव नेते – छगन भुजबळ सत्यशोधक चळवळ पुढे नेताना पुण्यातील भिडे वाड्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल… सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त खासदार शरद पवार यांच्या हस्ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com