कथित भूमाफियाचे मनीष नगरात सार्वजनिक जागेवर कब्जा ? मनसेने दिले निवेदन

नागपूर :- मनीष नगर भागातील सार्वजनिक वापराच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या कथित भूमाफियाची तक्रार मनसे कार्यालय नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्याकडे येताच यांनी या प्रकरणात तात्काळ निर्णय घेत आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विभागीय अधिकांऱ्याना निवेदन दिले व सदर विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिल्यामुळे आयुक्तांनी 24 तारखे पर्यंत अतिक्रमण साफ करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी विभाग अध्यक्ष चेतन बोरकुटे, विभाग संघटक चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष विनीत तांबेकर, विभाग सचिव साहिल बेहरे, शाखाध्यक्ष राजू काटवे, अजिंक्य मिश्रा, अजय पराशर, राहुल दंभाळे, शाखा सचिव प्रकाश मेंढे, शाखा संघटक विक्रांत सोनटक्के, अमोल दूरूगकर, राजू भैय्या, अशोक मेटांगळे, विशाखा ढोरे, महिला शाखा अध्यक्षा गुंजन पांगुळ, महिला विभाग उपाध्यक्ष प्रिया बोरकुटे व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहृदयतेमुळे मिळाली 19 तरुणांना शासन सेवेत नियुक्ती

Sun Nov 12 , 2023
– चार वर्षांची प्रतीक्षा फळाला मुंबई :- त्या 19 तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली. परंतु कोविड च्या साथीमुळे परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडली . या दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त बनले आणि या मुलांचे करिअर संकटात सापडले. परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या तरुणांच्या करिअरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com