३ हजार ९००  हेक्टर सिंचन क्षमतेच्या योजनांच्या सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाख निधीची तरतूद – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

 मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मुळा धरणाच्या जलाशय/ नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसासिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

            १०१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या १७ योजनांसाठी एकूण ३,९०० हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी २ कोटी ३७ लाख ३१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

            योजनांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच उपसा सिंचना योजनांच्या कामासाठी निधी उपलब्ध होण्याबाबतची मागणी वेळोवेळी करण्यात येत होती.त्यामुळेच उपसा सिंचन योजनांची क्षेत्रिय प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हयातील संगमनेर तालुक्यातील शिंदोडीमांडवेबिरेवाडीखरशिंदेसाकुरवरवंडीपेमगिरीशिरापूरडिग्रसपारेगाव खु. व बु.तिगावकाकडवाडीकरुलेक-हेनिमोनव सोनोशी या १७ गावातील अवर्षण प्रवण क्षेत्राचा समावेश आहे. या भागात उपसा सिंचन झाल्यास पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. २५१  ते ६००  हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या १८००  हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी ९६ लाख ९८  हजार १४१  रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १०१ ते २५०  हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या २१०० हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी १ कोटी ४०  लाख ३३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

            सर्वेक्षणानंतर प्रामुख्याने नलिका प्रणालीचे सखोल संकल्पन केल्यानंतर अहवाल सादर करण्यात येईल. याशिवाय नदीपात्रनदीकाठ ते जॅक वेल तसेच संपूर्ण नलिक वितरणाचे तलांक नकाशावर दर्शविण्यात येतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई होणार - गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

Thu May 26 , 2022
मुंबई  : अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, कर्जदारांच्या तक्रारींची दखल घ्यावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. सनदशीर मार्गाने कर्ज वसुली न करता ज्या कंपन्या कर्जदारांना अन्यायकारक वागणूक देत आहेत, अशा कंपन्यांविरोधात कर्जदारांनी पोलीसात तक्रार द्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री  देसाई यांनी केले आहे.             कोल्हापूर जिह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीने होणाऱ्या कर्ज वसुलीबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com