संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थाचां सत्कार कामठी भाजप कार्यालयात माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते आज शुक्रवारी करण्यात आला.
सर्वप्रथम शिवराज्यभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले.त्या नंतर प्रभाग 15 आनंद नगरातील यमन रामकुमार शाहू,प्रज्वल गेंदलाल सौलंकी, जितेश्वर केवलसिंग शाहू, निमेश सिमा सांगोडे, राज संजय पटले, शिवा मुन्ना बारेकर, अंकिता धनराज मानवटकर, सलोनी मनोहर सहारे, अंजली संजय देशभ्रतार, नेहा मुन्ना बारेकर, अंकिता जोशी जगणे, काजल मोतीराम भोंडेकर या गुणवंत विद्यार्थाचां शाल,पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा पदाधिकारी विक्की बोंबले, जितेंद्र खोब्रागडे, उज्वल रायबोले, महेंद्र वंजारी, अवि गायकवाड, शंकर चवरे, रोहित दहाट, अरविंद चवडे, दिनेश खेडकर प्रामुख्याने उपस्थित होते.