भंडारा :- काल सायंकाळी बेला व शहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात मेरी माटी,मेरा देश या उपक्रमातील शिलाफलकाचे अनावरण जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी या गावात निर्मित अमृतवाटीकेमध्ये वृक्षारोपण देखील केले.
मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण कालावधीत जिल्हाभर करण्यात आले आहे.जिल्हयातील 541 ग्रामपंचायतीमध्ये शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले आहे. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते वसुधा वंदन अंतर्गत अमृतवाटिका वृक्षलागवड करण्यात आली. वीरांना वंदन या कार्यक्रमात शहीद झालेले वीर ईशांतकुमार भूरे,भोजराज बाभरे आणि सुनील महादेव मेश्राम या वीरांना आदराजंली वाहून त्यांच्या कुटुंबियाचा सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रत्नमाला चेटूले होत्या. उपसरपंच अर्चना कांबळे परिविक्षाधीन आयएएस अधिकारी अनय नावंदर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी ,तसेच गटविकास अधिकारी डॉ.संघमित्रा कोल्हे ,ग्रामविकास अधिकारी खोब्रागडे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,उमेदच्या सविता तिडक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .