आजनी येथे पुरुष कबड्डी स्पर्धा संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुक्यातील आजनी येथे नुकतेच रेणुका क्रीडा मंडळ आणि सहकाऱ्यांच्या वतीने शनिवार दिनांक २९ मार्च ते रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी आयोजित भव्य ७० किलो वजनगटातील मॅटवरील पुरुष कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.

नवी कामठी पोलिस स्टेशनचे पी आय महेश आंधळे यांच्या हस्ते आणि माजी आमदार देवराव रडके यांच्या उपस्थितीत या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यातील विविध संघांनी यात सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे महसूल मंत्री आणि स्थानिक आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी ” देशातील तरुणांनी सशक्त होण्यासाठी खेळले पाहिजे आणि तरुणांचे अंगीभूत गुण विकसित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल”, असे ते म्हणाले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक एकलव्य क्रीडा मंडळ, सावनेर यांना सामाजिक कार्यकर्त्या लतेश्वरी आणि ब्रम्हाजी काळे यांच्याकडून २१,००० रुपयांचे रोख पारितोषीक तर द्वितीय क्रमांक येरखेडा येथील सेव्हन स्टार क्रीडा मंडळास विक्की बरोंडे स्मृती रविभाऊ बरोंडे यांच्या वतीने १५,००० हजार रुपयांचे रोख पारितोषीक देण्यात आले. तृतीय क्रमांकास सामाजिक कार्यकर्ते बळवंतराव नेऊलकर यांच्याकडून नागसेन क्रीडा मंडळ, कामठी यांना तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषीक आजनी येथील जय बजरंग क्रीडा मंडळाला देण्यात आले. माजी सभापती उमेश रडके यांच्या माध्यमातून बेस्ट रेडर, बेस्ट कॅचर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरिज पुरस्कार देण्यात आला. चंदूकाका डाबरे यांच्या माध्यमातून सर्व विजयी संघांना आकर्षक शिल्ड देण्यात आली.

यावेळी विदर्भ ग्रामीण कबड्डी संघाचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी जि.प.सदस्य अनिल  निधान, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सहसचिव सतीश डफळे, रेणुका क्रीडा मंडळाचे संस्थापक राहुल शेळके, भगवंतराव रडके, पोलिस पाटील बळवंतराव रडके, ग्राम पंचायत सचिव आतिश देशभ्रतार, सरपंच संजय जीवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, रेणुका क्रीडा मंडळाच्या सचिव अलका शेळके, गणेश झोड, अनिल जालंदर, राजेश काकडे, उमेश मस्के, गादा येथील सरपंच सचिन डांगे व पोलिस पाटील वंदना चकोले, ज्येष्ठ पत्रकार सुदाम राखडे, प्रवीण खीचर, नीरज रडके, दिवाकर घोडे, प्रवीण बावनकुळे, राधेश्याम इंगोले,अमित ठाकूर, स्वप्नील चौधरी, चेतन कुल्लरकर, कविता डोलीकर, नरेश जीवतोडे, जगदीश शाहू, घनश्याम चकोले, कवडू चिंचूलकर , शरद गोरले, विनोद वाट, शेषराव दवंडे, रामचंद्र देशमुख, प्रवीण वानखेडे, सुधाकर झलके, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सूत्र संचालन तसेच कॉमेन्ट्री नामदेव हेटे आणि लीलाधर दवंडे यांनी केले तर पंच म्हणून खुशाल येलेकार, शुभम, बंटी सलाम, रोहित जीवतोडे, अक्षय चिंचूलकर यांनी भूमिका पार पाडली.

या स्पर्धेसाठी रेणुका क्रीडा मंडळाच्या मुली तसेच मुलं, जय बजरंग क्रीडा मंडळाच्या खेळाडू, शालिक मोहतकार, महेंद्र मिरासे, दीपक नारनवरे, गजेंद्र ढोक, सूरज उकेबोंद्रे, बबलू नागोसे, दत्तू सोनटक्के, राजेश हरणे, नारायण वैद्य, निलेश मरसकोल्हे, स्वप्नील बावणे, ऋषिकेश भोयर, दिनेश मेश्राम, परमानंद बानेवार, यांनी विशेष श्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अत्त दिप भव बुद्ध विहार करिता भुखंडा ची मागणी

Tue Apr 1 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील रमाई नगरातील 50 वर्ष जुन्या अत्त दिप भव बुद्ध विहार करिता भुखंड मंजूर करण्याबाबत महसूल मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांना जनता दरबारात निवेदन देण्यात आले होते. ना बावनकुळे यांच्या निर्देशा नुसार कामठी प्रभाग 15 रमाई नगर येथील अत्त दिप भव बुद्ध विहार भूखंड मागणी करिताचे निवेदन उपेश अंबादे नायब तहसीलदार नझुल कामठी यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!