महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे

मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी अमरावती विभागाचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल यांनी ही नियुक्ती केली आहे. नवनियुक्त सदस्य डॉ. पांढरपट्टे यांना आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप रा. दिघावकर, सचिव डॉ. सुवर्णा सिद्धार्थ खरात, सहसचिव सुनील अवताडे आदी उपस्थित होते. आयोगाचे अध्यक्ष निंबाळकर यांनी सदस्य डॉ. पांढरपट्टे यांचे स्वागत करून परिचय करून दिला.           डॉ. पांढरपट्टे हे १९८७ च्या राज्य सेवा तुकडीचे अधिकारी आहेत.त्यांनी उपजिल्हाधिकारी, उपायुक्त म्हणून कोकण भवनसह कोकणात सेवा बजावली आहे. सन २००० मध्ये त्यांना अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती मिळाली. सन २०१५ मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्ग, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव, अमरावती विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. डॉ. पांढरपट्टे यांनी प्रशासकीय सेवेत राहून साहित्यिक सेवा बजावली आहे. त्यांनी उर्दू भाषेचे ज्ञान आत्मसात केले आहे. ‘गझल’ हा त्यांचा आवडता काव्य प्रकार आहे. त्यांची विविध विषयांवरील दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Thu Mar 2 , 2023
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना उद्या गुरुवार दि. 2 मार्च 2023 पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com